शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Konkan Politics : शिवसेनेकडून अपेक्षाच उरल्या नाहीत : निलेश राणेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:09 PM

Konkan Politics : शिवसेनेने कोकणाला मतांच्या बदल्यात काय दिले? आठ दिवसांनंतरही वादळग्रस्तांना मदत नाही. वैभव नाईक यांना प्रशासनात काडीची किंमत नाही. शिवसेनेकडून जनतेला अपेक्षाच नाहीत. त्यामुळे शक्य तेवढी मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजप करीत आहे. भाजप म्हणून आम्ही जनतेसोबत आहोत, असा विश्वास भाजप नेते, प्रदेश सचिव निलेश राणे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देशिवसेनेकडून अपेक्षाच उरल्या नाहीत : निलेश राणेंची टीका मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर होत नाही ही शोकांतिकाच

मालवण : शिवसेनेने कोकणाला मतांच्या बदल्यात काय दिले? आठ दिवसांनंतरही वादळग्रस्तांना मदत नाही. वैभव नाईक यांना प्रशासनात काडीची किंमत नाही. शिवसेनेकडून जनतेला अपेक्षाच नाहीत. त्यामुळे शक्य तेवढी मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजप करीत आहे. भाजप म्हणून आम्ही जनतेसोबत आहोत, असा विश्वास भाजप नेते, प्रदेश सचिव निलेश राणे यांनी व्यक्त केला.तौक्ते चक्रीवादळानंतर नुकसान झालेल्या मालवण, देवबाग, वायरी व अन्य परिसराची भाजप नेते निलेश राणे यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना पत्रे, ताडपत्री व जीवनावश्यक वस्तू, आदी मदतीचे थेट वाटप केले. नुकसानग्रस्तांना कौलांचेही वितरण केले जाईल. आम्ही आपद्ग्रस्तांसोबत आहोत, असा विश्वासही राणे यांनी दिला.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, विक्रांत नाईक, भाई मांजरेकर, जॅक्सन फर्नांडिस, अवी सामंत, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.वीजपुरवठा सुरळीत होण्यामागे स्थानिक जनतेलाच श्रेय जाते. सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. प्रशासनावर अंकुश नसल्याने मालवण अजूनही अंधारात आहे. मात्र, आम्ही सतत प्रशासनाच्या संपर्कात आहोत.वीज साहित्याची असलेली कमतरता दूर केली जाणार आहे. भाजप जनतेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.पत्रे विकणे आमदारांचा धंदा !, मंत्री नुसती आश्वासने देत आहेतवादळ, भूकंप झाला की आमदार वैभव नाईक यांचा सिझन चालू होतो. त्यांचा पत्र्याचा धंदा आहे. लाज वाटली पाहिजे शिवसेनेच्या आमदाराला. या आपत्ती काळात पत्रे विकणे सुरू आहे. ज्यावेळी जनतेला मदत पाहिजे, तेव्हा हे व यांचे मंत्री नुसती आश्वासने देत आहेत. मुख्यमंत्री येऊनही जनतेला मदत जाहीर होत नाही ही शोकांतिका आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली. मुख्यमंत्री यांच्याशी बोललेल्या क्लिप व्हायरल केल्यानंतर एसडीआरएफचा निधी आला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणkonkanकोकणNilesh Raneनिलेश राणे Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाShiv Senaशिवसेना