सिंधुदुर्गनगरी दि.08 : अनधिकृत जाहीराती, घोषणा फलक, होल्डींग्ज, पोस्टर्स आदी बाबत कारवाई करण्यासाठी तसेच या संदर्भातील तक्रारींचे निवारणासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरी / शहरी नगरपालिका, नगरपंचायतींचे क्षेत्र वगळून उर्वरित ग्रामीण भागासाठी आठही तालुक्यात नोडल अधिका-यांची नेमणुक जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केली आहे. डिफेसमेंट ॲक्ट 1995 मधील अंमलबजावणी या अधिका-यांमार्फत होणार आहे.
जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय नोडल अधिकारी
जिल्हा / तालुका - जिल्हा कार्यालय, नोडल अधिकारी - उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग. तक्रार निवारण कक्षाचा दुरध्वनी क्र. 02362-228796 मोबाईल. क्र.9730984504. शासकीय ई मेल आडी - vpdsindhu@gmail.com., सावंतवाडी - नोडल अधिकारी - गटविकास अधिकारी सावंतवाडी दुरध्वनी क्रमांक 02363-272026. मोबाईल क्र.9423053775. ई-मेल आयडी - bdosawntwadi@gmail.com, वेंगुर्ला - नोडल अधिकारी - गट विकास अधिकारी वेंगुर्ला. दुरध्वनी क्रमांक - 02366-262052 मोबाईल क्र.9420777524. ईमेल आयडी - bdoven@gmail.com, दोडामार्ग - नोडल अधिकारी गट विकास अधिकारी दोडामार्ग. दुरध्वनी क्र. 02363 -256724. मोबाईल क्र. 9822943036. ई-मेल आयडी - bdodmarg@gmail.com. कुडाळ - नोडल अधिकारी गट विकास अधिकारी कुडाळ. दुरध्वनी क्र. 02362- 222210. मोबाईल. क्र. 9765901601 . ई-मेल आयडी - bdokudal@gmail.com. मालवण - नोडल अधिकारी गटविकास अधिकारी मालवण दुरध्वनी क्र. 02365- 252029 मोबाईल क्र. 9422434629 ई-मेल आयडी- bdomalvan11@gmail.com. कणकवली - नोडल अधिकारी गट विकास अधिकारी कणकवली. दुरध्वनी क्र. 02367-232026. मोबाईल क्र. 9421121968 ई- मेल आयडी - bdoknk@rediffmail.com. वैभववाडी - नोडल अधिकारी गट विकास अधिकारी वैभववाडी . दुरध्वनी क्र. 02367- 237230. मोबाईल क्र. 9420225585. ई-मेल आयडी -bdovaibhavwadi11@gmail.com. देवगड - नोडल अधिकारी गट विकास अधिकारी देवगड. दुरध्वनी क्र. 02364- 262207. मोबाईल क्र. 9422065222. ई-मेल आयडी - bdodevgad@gmail.com. यासाठी टोल फ्री क्रमांक - 1077 राहील.
ग्राम पातळीवर लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होडिग्ज, पोस्टर्स आदी संदर्भात कार्यवाही संबंधित ग्राम पंचायतीमार्फत करण्यात येते. अनधिकृत आढळून आलेल्या प्रकरणामध्ये डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1995 नुसार आवश्यक दंड आकारणी करुन संबंधित ग्राम पंचायत कार्यालयामार्फत वसुल करुन शासन खाती भरणा केली जाते. तसेच फलक लावण्यासाठी ना- हरकत दाखला ग्राम पंचायत स्तरावरुन दिला जातो. उच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्देशानुसार तालुकास्तरावर नेमणुक केलेले नोडल अधिकारी या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी उपरोक्त नोडल अधिका-यांकडे संबंधित तालुक्यातील ग्राम पंचायतीबाबत तक्रार असल्यास संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
आचाहिता कालावधतीत पूर्व परवानरसंगी आवश्यक
खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जागांवर बॅनर, फलक लावण्याबाबत कोणताही राजकीय पक्ष वा उमेदवार ध्वजदंड उभारण्यासाठी, फलक टांगण्यासाठी, सूचना चिटकविण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी वैगरे कोणत्याही व्यक्तींच्या जमीन, इमारत, कुंपण इत्यादिचा त्याच्या मालकाच्या परवानगी शिवाय वापर करणार नाही. तसेच या संदर्भात महानगरपालिका अथवा जिल्हाधिकारी कार्यालय अथवा आवश्यकतेनुसार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडूनही परवानगी आवश्यक असेल. ( महाराष्ट्र मालमत्ता विरुपन प्रतिबंध अधिनियम, 1995 काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सदर अधिनियमाचे उल्लंघन केल्यास सदर अधिनियमातील कलमानुसार संबंधितावर कारवाई करणे.)
स्थानिक स्वराज्य संथाच्या मालकीच्या असलेल्या जागांवर निवडणूक प्रचाराचे बॅनर, फलक लावण्याकरीता परवागनी घ्यावी किंवा तसे याबाबत संबंधित महानगरपालिका आयुक्त / मुख्याधिकारी / जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी निवडणूक प्रचाराचे फलक / बॅनर लावण्यास परवागनी द्यावयाची असल्यास सर्व उमेदवार अथवा राजकीय पक्षांना समान व न्याय पध्दतीने त्याचे वाटप करता येईल. कोणत्याही उमेदवारास / पक्षास झुकते माप दिले जाणार नाही याची खबरदारी घेऊन आवश्यक तर सोडत पध्दतीने असे वाटप करण्यात यावे.