शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

वस्तू व सेवा कर विभागाचे असहकार आंदोलन सुरू, निर्णय न झाल्यास शनिवारपासून तीव्र आंदोलनाचा इशारा

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 02, 2023 1:00 PM

ओरोस : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची शासनाने पुनर्रचना करावी, या प्रमुख मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या विभागातील ...

ओरोस : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची शासनाने पुनर्रचना करावी, या प्रमुख मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी असहकार आंदोलन पुकारले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा अधिकारी आणि २२ कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान, बुधवारी कार्यालयाबाहेर शामियानामध्ये सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काम बंद आंदोलन छेडले आहे.राज्य व केंद्र सरकारच्या १४ विविध करांचे विलीनीकरण होऊन ९ जुलै २०१७ पासून देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायदा अस्तित्वात आला. यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण वाढला आहे. त्या अनुषंगाने या विभागाची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून केली गेली आहे. मात्र, मागील सहा वर्षे या मागणीकडे दुर्लक्ष होत असून, शासनाने पुनर्रचना केलेली नाही. शासनाने या विभागाच्या पुनर्रचनेबाबत निर्णय घ्यावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे.बुधवारी कार्यालय परिसरात सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत कामबंद आंदोलन पुकारले. या आंदोलनात राज्यकर उपआयुक्त अभिजित पोरे, सहायक राज्यकर आयुक्त प्रशांत कोरे, राज्यकर अधिकारी अनुज रासम, सुधीर नार्वेकर, तेजस्विनी शिंदे, व्यवसाय कर अधिकारी डॉ. दीपाली पाटील, अनिकेत रामाने आदी अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

लेखणीबंद आंदोलन३० व ३१ ऑक्टोबर या कालावधीत हजेरीपटावर स्वाक्षरी करून दोन तास ठिय्या आंदोलन कार्यरत वेळेपूर्वी व वेळेनंतर अतिरिक्त कामकाज नाही अशा स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले होते. तर बुधवारी १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत लेखणीबंद आंदोलन छेडण्यात आले आहे.

तीव्र आंदोलनाचा इशाराएकूण पाच दिवसीय असहकार आणि लेखणीबंद आंदोलनाची दखल न घेतल्यास ४ नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून यावेळी देण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गagitationआंदोलन