सिंधुदुर्ग : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील एकूण ९ लाख १४ हजार ३८ एवढ्या एकूण मतदानापैकी ११६४३ एवढी मते नोटाला देऊन या मतदारांनी उमेदवारांना नाकारले आहे. मात्र, या मतदार संघातील एकूण नऊ उमेदवारांपैकी सहा उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत.
नोटाला ११६४३ मतेलोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ११६४३ मतदाराने सर्वच नऊ उमेदवारांना नाकारले असून नोटाचा पर्याय स्वीकारला आहे.
सहा उमेदवारांना नोटापेक्षा कमी मतेरत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील सहा उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत.
२०१९च्या तुलनेत नोटाची मते वाढली२०१९ सालात् झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नोटांची संख्या १२३९८ होती. त्या तुलनेत यावर्षीच्या निवडणुकीत नोटांची संख्या घटली आहे.
नोटापेक्षाही कमी मते मिळालेले सहा उमेदवारउमेदवार मिळालेली - मते
- राजेंद्र आयरे (बसपा) - ७८५६
- अशोक पवार (बहुजन मुक्ती पार्टी) - ५२८०
- मारुती जोशी (वंचित आघाडी) - १००३९
- सुरेश शिंदे (सैनिक समाज पार्टी) - २२४७
- अमृत तांबडे (राजापूरकर, अपक्ष) - ५५८२
- शकील सावंत (अपक्ष) - ६३९५