शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
5
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
6
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
7
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
8
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
9
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
10
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
11
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
12
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
14
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
15
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
16
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
17
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
18
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
19
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
20
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story

आता बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सवरच

By admin | Published: August 16, 2016 9:56 PM

कोकण कृषी विद्यापीठ : दुर्घटना, वेळ वाचवण्यासाठी कुलगुरूंचा निर्णय

शिवाजी गोरे -- दापोली --महाडसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यांतील रिसर्च सेंटरशी यापुढे थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्याचा ऐतिहासिक निर्णय कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांनी घेतला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती व अतिवृष्टी याचा विद्यापीठातील बैठकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुळदे व ठाणे जिल्ह्यातील वाडा, रायगड जिल्ह्यातील कर्जत ही वेगवेगळी टोके आहेत. या ठिकाणाच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास बैठकांसाठी येणाऱ्यांचा वेळ, पैसा याचा अपव्यय होतो. त्याहीपेक्षा अतिवृष्टीच्या काळात महाडसारखी दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीसाठी दापोलीला येण्यासाठी दोन दिवस मोडण्यापेक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद सुलभ होणार आहे.दापोली कोकण कृषी विद्यापीठातील बैठकीसाठी लागणारा वेळ, पैसा त्याहीपेक्षा महाडसारखी दुर्घटना टाळण्यासाठी कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांनी हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. यापुढे दापोली कोकण कृषी विद्यापीठात बैठकीनिमित्त विभागप्रमुख, शास्त्रज्ञ यांना येण्याची गरज नाही. त्यांना विद्यापीठात आठ दिवसांनी, पंधरा दिवसांनी तसेच महिन्याला बैठकीसाठी विद्यापीठात यावे लागत होते. परंतु, आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट कुलगुरु, संचालक, कुलसचिव यांच्याशी संवाद साधता येणार आहे.कृषी विद्यापीठातील महत्वाची माहिती, आपत्कालीन बैठक, शेतकरी वर्गाला द्यावयाची माहिती, शासनाचे धोरणाबद्दलची माहिती ही शास्त्रज्ञ, विभागप्रमुख, कुलगुरु व संचालक हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार असून, तत्काळ उपाययोजना निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आधुनिक युगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रगतीकडे वाटचाल होण्याच्या दृष्टीने डिजिटल इंडियाचा रोल फार महत्वाचा ठरणार आहे. कोकण कृषी विद्यापीठांतर्गत चारही जिल्ह्यातील रिसर्च सेंटर, कॉलेज यांच्याशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यासाठी खर्च अधिक होईल, असे काही लोकांचे म्हणणे होते. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्समुळे वेळ, प्रवासाचा होणारा त्रास आणि कर्मचाऱ्यांचा होणारा खर्चसुद्धा वाचणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना दुर्घटनेला सामोरे जावे लागणार नाही.कृषी विद्यापीठात बेठकीसाठी येताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दुर्दैवाने कोणालाही महाडसारख्या दुर्घटनेला सामोरे जाऊन जीव गमवावा लागू नये. या दृष्टीने कृ षी विद्यापीठातील सर्वच संशोधन केंद्र, कॉलेज यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद सुरु केला आहे.- डॉ. तपस भट्टाचार्य, कुलगुरु, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली