सावंतवाडी: सध्या देशाला अणू उर्जा प्रकल्पाची गरज असून असे प्रकल्प झाले पाहिजेत अणू उर्जा प्रकल्पामुळे देशात आतापर्यंत कुठे हानी झाल्याचे उदाहरण नाही.त्यामुळे सरकार ने जनते मध्ये जाऊन प्रबोधन करावे तरच रत्नागिरी जिल्ह्यातील अणू उर्जा प्रकल्प मार्गी लागेल असे स्पष्ट मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ.रघुनाथ माशेलकर यांनी मांडले.
गरज भासल्यास मी स्वता प्रकल्पग्रस्तांचे प्रबोधन करण्यास जायला तयार आहे.कोकणची प्रगती साधायची असेल तर फक्त मनाची श्रीमंती असून चालणार नाही स्वताही श्रीमंत झाले पाहिजेत असे ही डाॅ.माशेलकर म्हणाले. डाॅ.रघुनाथ माशेलकर हे सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी तील कार्यक्रमा निमित्त आले असता पत्रकारांशी बोलत होते.
डाॅ.माशेलकर म्हणाले,देशात अनेक ठिकाणी अणू उर्जा प्रकल्प आहेत.तेथे आतापर्यंत कोणतीही चुकीची घटना घडली नाही.तसेच अणू उर्जा प्रकल्पामुळे आंब्याचे पीक नाहिसे होणार हे पूर्णपणे चुकीचे असून गुजरात जामनगर येथे तर अणू उर्जा प्रकल्प असतना चांगल्या पैकी आंब्याचे पीक येत आहे.त्यामुळे असे प्रकल्प होणे देशाच्या दृष्टीने गरजेचे आहे.असे ही त्यांनी सांगितले.
तसेच रत्नागिरी येथील प्रकल्प होण्यासाठी प्रबोधन ही महत्वाचे आहे.यासाठी त्यांनी ऑस्टोलिया मध्ये आपल्या मित्राने अणू उर्जा प्रकल्प उभारत असतना तेथील जनतेचे कसे प्रबोधन केले त्याचे उदाहरण दिले तसेच प्रबोधन रत्नागिरी जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त मध्ये झाले पाहिजे असे डाॅ.माशेलकर यांनी सांगितले.तसेच प्रबोधन करण्यासाठी सरकार ने सांगितल्यास मीही तेथे जाण्यास तयार आहे असून कोकणच्या श्रीमंती साठी माझे उर्वरित आयुष्य द्याला तयार आहे.असेही डाॅ.माशेलकर यांनी सांगितले.