शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

युवकांमधील हृदयविकाराचे प्रमाण चिंताजनक

By admin | Published: September 23, 2015 10:05 PM

बी. जी. शेळके : आज हृदयविकार जागरूकता दिन

मिलिंद पारकर -कणकवली ==अवघ्या २० ते ३० वयोगटातील तरूणांचे हृदयविकाराने अचानक मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बदलत्या जीवनशैलीचा फटका भारतीय तरूणांना बसत असून त्यामुळे नियमित तपासणी आवश्यक बनली आहे. तरूणांनी आपल्या हृदयाकडे जागरूकतेने बघून आहारविहारात आवश्यक बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिक हृदयविकार जागरूकता दिनानिमित्त डॉ. बी. जी. शेळके यांच्याशी साधण्यात आलेला संवाद..तरूणांचे हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या घटना वाढल्या आहेत?डॉ. शेळके : गेली पंचवीस वर्षे मी डॉक्टरी पेशात काम करताना अलिकडे २० ते ३० वयोगटातील मुलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे. ५० ते ६० वयोगटात येणारे हृदयविकाराचे झटके आता युवकांमध्येही बसत आहेत. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढते आहे. तरूण मुलांमध्ये रक्तदाबाचा विकार वाढत असल्याचे दिसून आले आहे. २०२० साली २०-३० वयोगटातील भारतीय तरूणांचे बळी जाण्याचे प्रमाण ५० हजार असेल, अशी शक्यता एका अभ्यासातून वर्तविण्यात आली आहे. आणि ती अतिशय धोकादायक आहे.युवकांमध्ये हृदयविकार वाढण्याचे कारण काय?डॉ. शेळके : सध्याची जीवनशैली बदलली असून ताणतणावाचे प्रमाणही वाढले आहे. हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित श्रम आवश्यक आहेत. परंतु युवकांच्या हाती दुचाकी, चारचाकी वाहने आहेत. आणि खाण्यात चायनीज, शीतपेये, फास्टफूड आहे. या खाण्यातून मीठाचे प्रमाण वाढते. तसेच शीतपेयांमधून अतिप्रमाणात साखर पोटात जाते. एका शीतपेयाच्या बाटलीतून २०० ग्रॅम साखर पोटात जाते. या साखरेतून तब्बल ८०० कॅलरीज शरीरात जातात. एवढ्या कॅलरी जाळण्यासाठी ६ तास व्यायाम करावा लागेल. छातीत मध्यभागी दुखणे, पोटापासून कानापर्यंत वेदना जाणे, विशेषत: डाव्या हातात वेदना होणे, घाम येणे, नाडीचे ठोके वाढणे, जीव घाबरा होणे आदी हृदयविकाराची लक्षणे आहेत पाश्चिमात्य जीवनशैली व भारतीय जीवनशैलीत फरक कोणता?डॉ. शेळके : पाश्चिमात्यांमध्ये आणि भारतीयांत भौगोलिक दृष्टीने मोठा फरक पडतो. पाश्चिमात्यांमध्ये सॅलडचा म्हणजे कच्च्या भाज्या, गाजर, टोमॅटो आदींचा आहारात वापर खूप असतो. त्यामुळे शरीरात फायबरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होते. हेच फायबर जास्तीच्या चरबीला शरीराबाहेर टाकतात. मात्र, आपल्याकडे भाज्या खाण्यास नाक मुरडले जाते. पाश्चिमात्य जीवनशैलीत एकाच वेळी पोटभर न खाता दिवसातून चार-पाच वेळा थोडे-थोडे खाल्ले जाते. आपल्याकडे एकाचवेळी जास्त खाण्यावर भर दिला जातो. पाश्चिमात्यांच्या शरीरात मूळातच घातक कॉलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. तर भारतीयांमध्ये जास्त असते. पाश्चिमात्यांचा ३० बीएमआय नॉर्मल समजला जातो. तर आपल्याकडील व्यक्तीमध्ये २५ बीएमआय (वजन-उंची गुणोत्तर) ही पातळी ठरवण्यात आली आहे. हॉटेलात जाऊन खाण्यामुळे धोका वाढतोय का?डॉ. शेळके : निश्चितच. हॉटेलमध्ये जाऊन खाण्याकडे युवकांचा विशेषत: कल वाढला आहे. त्यामध्येही चमचमीत चायनीज खाण्यावर भर दिला जातो. एकाच तेलात परत परत तळल्याने घातक कॉलेस्टेरॉल तेलात उतरतात. हॉटेलमधील बहुतांश पदार्थ मैद्यापासून बनवले जातात. ज्यामध्ये फायबरचा लवलेश नसतो. एक कप चहात ७० कॅलरीज असतात. जास्त कॅलरीज (उष्मांक) ग्रहण करणाऱ्या व्यक्तींचे आयुर्मान कमी असते असा अभ्यास आहे. उष्मांक घेण्याचे प्रमाण वाढल्यास नवीन पेशी, रक्तवाहिन्या निर्माण होण्याचे प्रमाण घटते आणि अकाली मृत्यूची शक्यताही वाढत जाते.