शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदूची संख्या घटली

By admin | Published: August 30, 2015 12:26 AM

मुस्लिमांच्या संख्येत वाढ : १४५२ जणांकडून कोणताही धर्म माहित नसल्याची नोंद

सिंधुदुर्गनगरी : सोमवारी घोषित करण्यात आलेल्या जनगणनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अहवालानुसार २००१ ते २०११ या दहा वर्षात हिंदूंची संख्या २२ हजार ११४ ने कमी होवून ती ७ लाख ८० हजार ३८४ एवढी आहे. तर मुस्लिमांच्या संख्येत २९९६ ने वाढ झाली असून ती २६ हजार २८४ एवढी आहे. बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख या अल्पसंख्याकांच्या वाढीच्या दृष्टीने काही शेकडो वाढ तर शेकडोने घट झालेली दिसून येते. लोकसंख्येची आकडेवारी गोळा करताना जनगणना विभागाने ग्रामीण आणि शहरी असे वर्गीकरण केले आहे. या अहवालामध्ये १४५२ जणांनी आपला कोणताही धर्म नसल्याचे सांगितल्याची नोंद आहे तर ५३ जणांनी आपला धर्म कोणता आहे हे माहित नसल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्येसंबंधीची धर्मनिहाय आकडेवारी केंद्र शासनाने जाहीर केली आहे. ही आकडेवारी सन २०११ यावर्षी घेण्यात आलेल्या जनगणनेवर आधारीत आहे. २००१ च्या जनगणनेनुसार त्यावेळी सिंधुदुर्गात हिंदूंची संख्या ८ लाख २४९८ होती. २०११ पर्यंत त्यात २२ हजार ११४ ने घट होवून ती ७ लाख ८० हजार ३८४ झाली. मुस्लिमांची संख्या २००१ मध्ये २३ हजार ६६८ होती. २०११ मध्ये त्यात २९९६ ने भर पडत ती २६ हजार २६४ झाली आहे. २००१ च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्याही ८ लाख ६८ हजार ८२५ एवढी होती. या लोकसंख्येतील हिंदूंची संख्या ८ लाख २ हजार ४९८ एवढी होती. तर मुस्लीम धर्मीयांची संख्या २३ हजार ६६८ एवढी होती. सन २०११ ची जनगणना जाहीर झाली तेव्हा त्यात मुळात सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या ही तब्बल १९ हजार १७४ लोकसंख्येने घटली व ती आता ८ लाख ४९ हजार ६५१ एवढी आहे. (प्रतिनिधी) सिंधुदुर्गची लोकसंख्या साडेआठ लाख २००१ च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ लाख ६८ हजार ८२५ एवढी लोकसंख्या होती. मात्र, २०११ च्या जनगणनेनुसार त्यात १९ हजार १७४ ची घट होती ती आता ८ लाख ४९ हजार ६५१ एवढी निश्चित झाली आहे. यात ४ लाख १७ हजार ३३२ पुरुष तर ४ लाख ३२ हजार ३१९ स्त्रीयांचे प्रमाण आहे.