शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

भूसंपादनाबाबत आक्षेप; विकासाला विरोध नाही

By admin | Published: May 19, 2015 10:20 PM

नीतेश राणे : महामार्ग चौपदरीकरणात प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे

कणकवली : माझ्यासह कणकवली मतदारसंघातील कोणत्याही ग्रामस्थाचा विकासाला विरोध नाही आहे. मात्र, प्रशासनाकडून सध्या महामार्ग चौपदरीकरणाबाबत सुरू असलेल्या भूसंपादनाला आमचा आक्षेप आहे. प्रशासन ग्रामस्थांना अंधारात ठेऊन राबवित असलेल्या भूसंपादनाला आमचा कडाडून विरोध असून असे भूसंपादन कदापी होवू देणार नाही, असा सज्जड दम आमदार नीतेश राणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंगळवारी भरला. दरम्यान, युती शासनाच्या सहा महिन्यांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्व स्तरातून विकास पूर्णपणे ठप्प झाला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नीतेश राणे म्हणाले, प्रशासन राबवित असलेल्या भूसंपादनाला आमचा आक्षेप आहे. प्रशासन लोकांना अंधारात का ठेवत आहे ? सर्व लोकांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून आपण राबवित असलेल्या मोजणी प्रक्रियेबाबत माहिती का देत नाही ? ग्रामस्थांना धमकावून, खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत ही काय हुकूमशाही आहे की काय ? प्रशासकीय अधिकारी चोरासारखे मोजणी करायला फिरत आहेत. काही ठिकाणी सकाळी ६ वाजता, रात्री अपरात्री कशाची मोजणी करता? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.युती शासनाच्या गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामे पूर्णपणे ठप्प आहेत. वाळू, मच्छिमारी, महसूलचे तलाठ्यांचे आंदोलन, भात गोडावनात सडत असलेला भातसाठा अशा अनेक प्रश्नांवर येथील शासनकर्त्यांकडे उत्तरेच नाहीत. आंबा बागायतदार, शेतकरी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे त्रस्त आहे. मात्र, याला कोणत्याही प्रकारची मदत शासनाकडून जाहीर झालेली नाही. त्यातूनच देवगड येथील एका बागायतदाराने मागील आठवड्यात आत्महत्यादेखील केली आहे. असे सर्व घडत पालकमंत्री मात्र बिअरबारच्या उद्घाटनांना हजेरी लावत आहेत. त्यामुळे येथील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालकमंत्री कोणतीही ठोस भूमिका घेत नाही, प्रशासनावर त्यांचा कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. परिणामी जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. युती शासनाच्या पाच वर्षांच्या कालावधीपैकी अवघ्या सहा महिन्यातच जनता कंटाळली असून त्यावेळी आपण चूक केली काय? असा प्रश्न आपआपसात विचारताना आढळत आहे. (प्रतिनिधी)२३ पासून प्रत्येक गावाला भेट देणारमहामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत आपण २३ मे पासून भूसंपादन होणाऱ्या प्रत्येक गावात भेट देणार असून तेथील लोकांच्या समस्या जाणून घेणार आहे. त्यानंतर या सर्व गावभेटीतून एक आवाज बनवून प्रशासनासमोर आपले म्हणणे मांडणार आहे. सध्या लोकांना विश्वासात न घेता छुप्या पद्धतीने सुरू असलेले भूसंपादन बंद पाडण्यात आले आहे. त्याबाबत आपण प्रांताधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली आहे. मात्र, यानंतर ग्रामस्थांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जोपर्र्यत प्रशासन देत नाही. तोपर्यंत कोणतेही काम सुरू करायला देणार नाही, असा दम नीतेश राणे यांनी भरला.प्रशासनाने महामार्गाच्या भूसंपादनाबाबत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार कराव्यात. पारदर्शकपणे प्रक्रिया राबवावी. प्रत्येकाच्या मनात असलेल्या भूसंपादनाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. शंकांचे निरसन करावे. तर आणि तरच आपण लोकांना घेऊन प्रशासनाला योग्य ते सहकार्य करण्यास तयार आहे.- नीतेश राणे, आमदार, कणकवली मतदारसंघतलाठ्यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणारसिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यात मार्ग काढायचा सोडून प्रशासन ताठर भूमिका घेऊन आपले ते खरे करत आहे. या आंदोलनामुळे महसूलची गावागावातील सर्व कामे ठप्प आहेत. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी स्पष्ट केले.