शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

वृद्ध कलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत

By admin | Published: September 23, 2015 10:24 PM

शिवराम कांदळकरांची व्यथा : ४० वर्षे कला जोपासणाऱ्याकडे शासन लक्ष देईल का ?

मालवण : कोकणासह सिंधुदुर्गात गणेशोत्सवाकडे महाउत्सव म्हणून पाहिले जाते. घरोघरी आकर्षक व मोठ-मोठ्या गणपती मूर्ती असतात. शेकडो वर्षांची येथे प्रथाच आहे. अगदी गावागावात गणेश मूर्ती बनविणारे कलाकारही शेकडोच्या संख्येने आहेत. पिढीजात गणेश मूर्ती बनविण्याची कला जोपासणारे यातील अनेक कलाकार आजही शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेपासून वंचित आहेत. ४० वर्षाहून अधिक काळ मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील गणेश मूर्ती कला जोपासणारे शिवराम (काका) शंकर कांदळकर हे त्यापैकीच एक. वयाची ८३ वर्षे पूर्ण झाली तरीही आजही काका कांदळकर गणेश मूर्ती साकारत आहेत. शासनाच्या कांदळकर यांना वृद्ध कलाकार मानधन योजना सुरु करावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांसह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. परिसरातील अनेक कुटुंबीयांच्या निवासस्थानी काका कांदळकर यांनी साकारलेल्या आकर्षक व सुबक मूर्तीचे पूजन होते. अगदी हडी, सर्जेकोट, कांदळगाव, कोळंब, वायरी या मालवण तालुक्यातील गावात व शहराच्या ठिकाणी यांनी साकारलेल्या गणेश मूर्ती मागविल्या जातात. ४० हून अधिक काळ गणेश मूर्ती बनविण्याबरोबर शेती हा त्यांचा व्यवसाय आहे. गेली काही वर्षे त्यांचा मुलगा युवराज मूर्ती साकारण्यात हातभार लावतो. मात्र, काका कांदळकर या कलाकाराकडे शासनाचे अद्यापही लक्ष गेलेले नाही. आता वृद्धापकाळाने शेती व चित्रशाळा चालविणे अवघड होत आहे. मूर्तीकला व्यवसायातही महागाईचा विचार करता अनेक अडचणी, समस्या आहेत. मात्र, त्या सर्वावर मात करून गणेश भक्तांना आकर्षक मूर्ती बनवून देताना काका कांदळकर यांच्याकडून ही कला आजही जोपासली जात आहे. तरी शासनाने या कलाकाराकडे लक्ष देऊन वृद्ध कलाकार मानधन योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी कुटुंबीय व गणेशभक्तांसोबत ग्रामस्थांतून होत आहे. (प्रतिनिधी)