कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली बसस्टँडसमोर ८ एप्रिल रोजी सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास गोवा बनावटीची दारू वाहतूक करीत असताना संशयित आरोपी किशोर वासुदेव सामंत (३२, रा. फोंडाघाट) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने रंगेहाथ पकडले आहे. यावेळी अल्टोकारमध्ये १ लाख ३९ हजार ८०० रुपयांची गोवा बनावटीची दारु १७ बॉक्समध्ये आढळून आली. कारकारसह २ लाख ८९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत माहिती अशी की, महामार्गावर दारू वाहतूक होणार असल्याची पक्की माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार कणकवलीत सापळा रचण्यात आला होता.आरोपी किशोर सामंत याने अल्टो कार (एम.एच. ०७, क्यू. ३७२९) मध्ये गोवा बनावटीच्या दारुचे १७ बॉक्स ठेवले होते. त्यामध्ये विविध ब्रॅण्डची दारू सीलबंद बाटल्यांमध्ये होती. एकूण १७ बॉक्समध्ये १ लाख ३९ हजार ८०० रुपयांची दारू आढळून आली आहे.ही कारवाई विभागीय उपायुक्त यशवंत पवार, सिंधुदुर्ग अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक राजन साळगावकर यांनी केली.
या पथकात दुय्यम निरीक्षक गणेश जाधव, गोपाळ राणे, सूरज चौधरी, स्नेहल कुवेसकर, रणजित शिंदे आदी कर्मचारी सहभागी होते. याप्रकरणाचा अधिक तपास निरीक्षक आर. जी. साळगावकर करीत आहेत.कणकवली येथे गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करणाऱ्या आरोपीसह कार ताब्यात घेण्यात आली.डंपर-कार अपघातात कारचे नुकसान आंबेली कोनाळकरवाडी येथील घटनादोडामार्ग : आंबेली-कोनाळकरवाडी येथे डंपर व कारमध्ये झालेल्या अपघातात कारचे नुकसान झाले. हा अपघात बुधवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. मांगेली येथील विजय गवस हे आपल्या ताब्यातील कार घेऊन मांगेली येथून दोडामार्गमार्गे गोव्याला जाण्यास निघाले होते. यावेळी त्यांच्या कारमध्ये अन्य दोघेजण होते. याच मार्गावरून त्यांच्या पाठोपाठ सुसाट वेगाने येणाºया डंपर चालकाने कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात डंपर कारला घासला जाऊन अपघात झाला. गवस यांनी वेळीच कारवर नियंत्रण मिळविल्याने कार कालव्यात जाता जाता वाचली. अन्यथा अनर्थ घडला असता. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याच्या कडेला संरक्षण कठडा असल्याने मोठा अपघात टळला. डंपर मालकाने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केल्यानंतर हा विषय सामंजस्याने मिटविण्यात आला.