मुंबई : अमली पदार्थाची विक्री करणाºया दोघा तस्करांना अटक करून आंबोली पोलिसांनी तीन किलो नेफे ड्रॉन (एमडी) जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या पदार्थांची किंमत सुमारे १ कोटी असल्याचे सांगण्यात आले. अहमद हुसैन व आसिफ कुरेशी अशी अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ आंबोली पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली़ एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्याची गेल्या काही वर्षांतील मुंबईतील ही पहिलीच घटना आहे.नववर्षानिमित्त आयोजित पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा होण्याच्या शक्यतेने पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आंबोलीत एका ठिकाणी अमली पदार्थांची विक्री करण्यास एक जण येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक दया नायक यांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक भारत गायकवाड यांच्या सूचनेनुसार शनिवारी रात्रीपासून त्या परिसरात पाळत ठेवण्यात आली होती. रविवारी पहाटे स्कूटीवरून आलेला एक तरुण दुसºया तरुणाकडे पिशवी देत असताना पोलिसांनी त्यांना पकडले. झडतीमध्ये त्यांच्याकडे ५०० ग्रॅम एमडी आढळून आले़ हुसैन याच्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी अडीच किलो एमडी मिळाले़ ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांमध्ये वितरित करण्यासाठी त्यांनी हा ऐवज आणला होता.
आंबोलीतून एक कोटीचे एमडी जप्त , दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 5:46 AM