शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

साळिस्ते येथील अपघातात एक ठार

By admin | Published: October 30, 2016 11:00 PM

कंटेनर-दुचाकीमध्ये धडक : दोन्ही वाहनांचे नुकसान

नांदगाव : मुंबई-गोवा महामार्गावर साळिस्ते ढाब्यानजीक मालवाहतूक करणारा फिशरीज कंटेनर व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार परशुराम दामू राठोड (वय ५५) ठार झाले. यावेळी कंटेनरचालक धडक देऊन पळून जात असताना तळेरे येथील ग्रामस्थांनी त्याचा मार्ग अडवत फिशरीज कंटेनरसह त्याला पकडले. हा अपघात रविवारी सकाळी ११.३० वाजता घडला. रविवारी लक्ष्मीपूजन असल्याने सर्वत्र खरेदीचा व दुकानदारांचा महत्त्वाचा दिवस होता. मूळ जालना येथील व सध्या कासार्डे बंडवाडी येथे राहणारे परशुराम दामू राठोड हे तळेरे येथे बाजारासाठी आले होते. व्यवसायाने सेंट्रिंग काँट्रॅक्टर असणारे राठोड आपल्या मित्रांसह दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात आले होते. बाजार आटोपल्यानंतर ते तळेरे येथून साळिस्ते येथे आपल्या दुचाकीवरून कामाच्या ठिकाणी जात होते. याचवेळी आदित्य गोहएन (२५, रा. काकोपटेर, टिनसुकाई, आसाम) हा खेड ते गोवाच्या दिशेने फिशरीज कंटेनर घेऊन जात असताना साळिस्ते ढाब्यानजीक आला असता समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालक राठोड फिशरीज कंटेनरवर आपटल्यानंतर त्याच्या दुचाकीचे नुकसान झालेच तसेच फिशरीज कंटेनरचा पुढील भाग तुटून समोरील काच फुटली. यात परशुराम राठोड यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णवाहिकेने नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याच दरम्यान, फिशरीज कंटेनरचालक कंटेनरसह पळून जात असताना ग्रामस्थांनी त्याला अडवत जाब विचारला व कासार्डे दूरक्षेत्राचे गणेश भोवड यांच्या ताब्यात दिले. मात्र, ऐन दिवाळी सण साजरा होत असताना लक्ष्मीपूजनादिवशीच राठोड कुटुंबावर काळाने घाला घातल्याने मोठे संकट कोसळले. परशुराम राठोड यांचे मूळ गाव जालना असून, ते पत्नी व मुलांसह कासार्डे बंडवाडी येथे गेली अनेक वर्षे वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे तळेरे परिसरात बरेच मित्र आहेत. तळेरे दशक्रोशीत ते सेंट्रिंग काँट्रॅक्टर म्हणून काम करत होते. यामुळे या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. यावेळी कंटेनरचालकास पकडण्यासाठी व मदतकार्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य बाळा जठार, तळेरेचे माजी सरपंच दिलीप तळेकर, बाळा कदम, दीपक नांदलस्कर, सरपंच प्रवीण वरुणकर, उदय बारस्कर यांनी सहकार्य केले. यावेळी कणकवली पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला व कंटेनरचालकास ताब्यात घेतले. राठोड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत. राठोड यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (वार्ताहर)