मालवण : वडाचापाट येथील तरुणाची आॅनलाईन कार खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. माटुंगा-मुंबई येथील राहुल गणेश चव्हाण या कार एजंटने संदेश रामचंद्र कासले यांना १ लाख ३९ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी कासले यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार संशयिताविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ५ ते ११ डिसेंबर या कालावधीत घडला.वडाचापाट बौद्धवाडी येथे राहणाऱ्या संदेश रामचंद्र कासले याने ५ सप्टेंबर रोजी कारवाला डॉट कॉम या अॅपवरून हुंडाई आय २० ही कार खरेदीसाठी नोंदणी केली. त्यानंतर कार ताब्यात घेण्यासाठी कासले मुंबईत गेले असता राहुल चव्हाण या कार एजंटशी भेट झाली. त्यावेळी चव्हाण याने नोंदणी केलेल्या कारची विक्री झाली आहे, असे सांगत अन्य कारचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवतो असे सांगितले.त्यानंतर त्याने वेगवेगळ्या कारचे फोटो कासले यांना पाठविले. त्यात कासलेना मारुती सुझुकीची इर्टिका कार आवडली. मोबाईलवरून कारचा व्यवहार १ लाख ९५ हजार रुपयांना ठरला. यावेळी चव्हाण याने आपल्या बँक खात्यावर इर्टिका कारसाठी ५० टक्के आगाऊ रक्कम भरण्यास सांगितले. त्यानंतर संदेश कासले याने चव्हाण याच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने १ लाख ३९ हजार रुपये पाठविले.कासले यांनी कार खरेदीसाठी ठरलेली रक्कम चव्हाण याच्या खात्यावर जमा केली. मात्र, त्यांना कार ताब्यात मिळाली नाही. कासले मुंबईत गेल्यावर त्यांना एक धनादेश देण्यात आला. मात्र तो बँकेत वटला नाही. म्हणून ते पुन्हा मुंबईत गेले असता चव्हाण याच्याशी भेट झाली नाही. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मसुरे पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली. याप्रकरणी चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी करीत आहेत.
आॅनलाईन कार खरेदीत एक लाखावर गंडा; एकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 5:23 PM
वडाचापाट येथील तरुणाची आॅनलाईन कार खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. माटुंगा-मुंबई येथील राहुल गणेश चव्हाण या कार एजंटने संदेश रामचंद्र कासले यांना १ लाख ३९ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी कासले यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार संशयिताविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ५ ते ११ डिसेंबर या कालावधीत घडला.
ठळक मुद्देआॅनलाईन कार खरेदीत एक लाखावर गंडा; एकावर गुन्हामुंबईतील संशयित : वडाचापाट येथील तरुणाची फसवणूक