कुडाळ : आमदार वैभव नाईक यांनी नवीन बसस्थानकासाठी प्रयत्न केले. त्यांच्या जोरदार पाठपुराव्यामुळे हे बसस्थानक मार्गी लागले. वैभव नाईकांनी जबाबदारी घेत हे काम पूर्ण केले. आता ज्या सुविधा लागतील, त्या सर्व लवकरच पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा कोरोना संकटामुळे लांबला होता. अखेर आज हा सोहळा झाला. लालपरीचा जनसंपर्क पुन्हा एकदा ग्रामीण भागाशी निश्चितच होईल, असे प्रतिपादन परिवहनमंत्री अनिल परब यांनी कुडाळ बसस्थानकाच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी केले.कुडाळ नवीन बसस्थानकाचा प्रारंभ मंत्री अनिल परब यांनी मुंबई मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीने केला. यावेळी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष ओंकार तेली, उपसभापती जयभारत पालव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस सचिव काका कुडाळकर, उपाध्यक्ष सुनील भोगटे, नगरसेवक सचिन काळप, रुपेश पावसकर, राजू गवंडे, बाळा पावसकर, शिवसैनिक रमेश हरमलकर, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवसेना तालुका संघटक बबन बोभाटे, राजन नाईक, संजय भोगटे, विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ, कुडाळ आगारप्रमुख सुजित डोंगरे, उपविभाग नियंत्रक गोसावी, विद्युत अभियंता प्रकाश नेरुरकर, सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी परब यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कुडाळ शहरातील बसस्थानक यापूर्वी १९७१ मध्ये बांधले होते व त्याला वेगळे महत्त्व आहे. या शहरात येणारा प्रवासी हा ग्रामीण भागातील आहे. आता हे नवीन बसस्थानक आमदार नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच मार्गी लागले. या कार्यक्रमाची प्रस्तावना विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी केली.बसस्थानकांचे नूतनीकरण करणारयावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, या बसस्थानकाची काही कामे प्रलंबित होती, म्हणून लोकार्पण सोहळा लांबला होता. ही कामे पूर्ण झाली असून, ७० टक्के बसेस सुरू झाल्या आहेत. लवकरच मुंबईत पाठविलेले कर्मचारी आल्यानंतर १०० टक्के बसेस धावतील. यावेळी त्यांनी मंत्री परब यांच्याकडे, त्या कर्मचाऱ्यांना त्वरित माघारी पाठवा, अशी मागणी केली. जिल्ह्यातील मालवणसह इतर बसस्थानकांचेही नूतनीकरण करण्यात येईल, असेही नाईक म्हणाले.कुडाळ बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी आमदार वैभव नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ओंकार तेली, जयभारत पालव, अमित सामंत, काका कुडाळकर, सुनील भोगटे, सचिन काळप, रूपेश पावसकर आदी उपस्थित होते.
कुडाळ बसस्थानकाचे ऑनलाईन उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 7:11 PM
Kudal Busstand ViabhaNaik Sindhudurg- आमदार वैभव नाईक यांनी नवीन बसस्थानकासाठी प्रयत्न केले. त्यांच्या जोरदार पाठपुराव्यामुळे हे बसस्थानक मार्गी लागले. वैभव नाईकांनी जबाबदारी घेत हे काम पूर्ण केले. आता ज्या सुविधा लागतील, त्या सर्व लवकरच पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा कोरोना संकटामुळे लांबला होता. अखेर आज हा सोहळा झाला. लालपरीचा जनसंपर्क पुन्हा एकदा ग्रामीण भागाशी निश्चितच होईल, असे प्रतिपादन परिवहनमंत्री अनिल परब यांनी कुडाळ बसस्थानकाच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी केले.
ठळक मुद्दे कुडाळ बसस्थानकाचे ऑनलाईन उद्घाटनसुविधा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार : अनिल परब