शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पालकमंत्र्यांकडून फक्त फसव्या घोषणाच

By admin | Published: March 25, 2016 9:27 PM

परशुराम उपरकर : सिंचनसह अन्य प्रकल्प प्रलंबित

कणकवली : सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले पालकमंत्री दीपक केसरकर अर्थराज्यमंत्री असल्याने जिल्ह्याबरोबरच कोकणच्या विकासाला चालना मिळेल, अशी आशा येथील जनतेला वाटत होती. येथील सिंचनसह अन्य प्रकल्प प्रलंबित असताना राज्याच्या अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची तरतूद होईल, असे वाटले होते. मात्र, नुसत्या फसव्या घोषणांव्यतिरिक्त पालकमंत्र्यानी काहीच न केल्याने ते कुचकामी ठरले असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे केली.येथील तेली आळीतील संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पावर पूर्वीच्या मंत्र्यांप्रमाणेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री हात वरती करण्यापुरतेच राहिले आहेत. कोकणातील अनेक सिंचन प्रकल्प प्रलंबित असून त्यासाठी निधीची तरतूद केलेली नाही. जिल्ह्यातील आरोग्य विभागाची दुर्दशा झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांत अपुरे कर्मचारी असल्याने निधी खर्च होऊ शकत नाही. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून मंजूर असताना त्याला विकास कामांसाठी निधी मिळत नाही. तर यापुढे जावून औरंगाबाद जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून दर्जा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री फक्त घोषणा करीत आहेत. ६00 कोटी, ९00 कोटी, १३00 कोटींचा निधी आणला, असे ते सांगत आहेत. मात्र, आराखड्यापेक्षा जिल्हा नियोजनचा निधी दहा कोटींनी कमी झाला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचे वजन मंत्रिमंडळात किती आहे, हे यावरून दिसून येते.कोकणात पाऊस जास्त पडत असल्याने पाण्याचा साठा करण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्यासाठी निधीची तरतूद गरजेची आहे. मात्र, विदर्भ, मराठवाडा भागासाठी मालगुजारी तलावासाठी ५000 कोटींची तरतूद केली जाते. तर याच भागातील आजारी उद्योगांसाठी २000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील आजारी उद्योग, शेतकऱ्यांसाठी निधीची तरतुदच नाही. याला काय म्हणावे?जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर दीपक केसरकर यांचे येथील विकासाकडे दुर्लक्षच झाले आहे. आताचे पालकमंत्री आणि पूर्वीचे पालकमंत्री एकसारखेच आहेत. फक्त सिंचनाला पैसे नाहीत, असे भाषणातून ओरडण्यापलीकडे पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी काहीच केलेले नाही. त्यामुळे आघाडी शासनाप्रमाणेच युती शासन कोकणच्या बाबतीत दुजाभाव करीत आहे. यापूर्वी ५३३२ कोटींचे पॅकेज कोकणसाठी जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात धरणांसाठी किती पैसे आले? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. शासनाकडून खोटी आश्वासने देऊन कोकणी माणसाला फसविण्याचे काम केले जात आहे. तर पालकमंत्री यामध्ये एक पाऊल पुढे असून त्यांचे कर्तृत्व शून्यच आहे, असेही उपरकर यावेळी म्हणाले. (वार्ताहर)