लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप पक्षाच्या घटनेची पायमल्ली केली जात आहे. नियुक्तीपत्रे पक्षाच्या घटनेविरोधी आहेत. भाजपात आकस्मिक निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चौकशी समितीकडे कोणतेही लेखी पत्र नव्हते. त्यामुळे भाजपात घटनाविरोधी भूमिका घेणाºया नेत्यांनी पक्षाच्या घटनेला काळिमा फासला आहे, असा खळबळजनक आरोप भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी करीत, याबाबत येत्या १८ आॅगस्टला पक्षाच्या राजमार्गानुसार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसेच वेळ पडल्यास राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचाही इशारा दिला.दरम्यान, मालवण तालुकाध्यक्षपदी विजय केनवडेकर यांची झालेली नियुक्ती घटनाबाह्य आहे. अद्यापही पक्षाकडूनमला तालुकाध्यक्ष बदलाविषयी कळविण्यात आलेले नाही. तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावरच असून, पक्षाला अपेक्षित काम मी केले आहे. घटनेची पायमल्ली जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत तालुक्यात निर्माण झालेला वाद थांबणार नाही, असेही मोंडकर यांनी स्पष्ट केले.मालवण तालुका भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बाबा मोंडकर यांनी भूमिका स्पष्ट करताना आपल्याकडे आलेल्या चौकशी समितीवर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केली, तर चौकशीसाठी आलेल्या भाजपचे प्रवक्ते काका कुडाळकर यांच्यावरही गंभीर आरोप करताना त्यांचा निषेधही केला. यावेळी शहर अध्यक्ष बबलू राऊत, दादा वाघ, प्रदीप मांजरेकर, अविनाश सामंत, अरविंद मोंडकर, आदी उपस्थित होते.मोंडकर म्हणाले, तालुकाध्यक्ष निवडीवर आक्षेप नाहीच; पण निवडप्रक्रिया लोकशाही मार्गाने होणे आवश्यक होते. पत्रे वाटून नियुक्त्या देणे पक्षाच्या घटनेत नाही. याबाबत आपण नाराजी व्यक्त केली. मला भाजपकडून सन्मान मिळाला असून, कोणत्याही पदाचा मोह नाही. घटनेनुसार मी बुथ कार्यकर्ता म्हणून काम करण्यास तयार आहे. काका कुडाळकर यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. पत्रकार परिषद सुरू असताना मच्छिमारांनी प्रमोद जठार यांच्या विरोधात प्रतीकात्मक पुतळा जाळला. यात पक्षाची भूमिका नव्हतीच. मच्छिमारांच्या समस्यांची दाहकता दहन होत असल्याने एकही भाजप कार्यकर्ता पुढे सरसावला नाही, असे मोंडकर यांनी सांगत कुडाळकर यांच्या आरोपांचे खंडन केले.गोपनीय अहवाल ‘व्हायरल’ कसा झाला?घटनेविरोधी नियुक्ती केल्याच्या पार्श्वभूमीवर माझ्याकडे आलेल्या तथाकथित एक सदस्यीय समितीकडे मुळात चौकशीचे पत्रही नव्हते.आपण चौकशीसाठी आलो असून, याचा अहवाल जिल्हाध्यक्षांना सादर करणार आहोत, असे सांगितले.यावेळी त्यांना पत्रकार परिषद घेणार का? असे विचारले असता त्यांनी नकार देत, आपण शासकीय विश्रामगृह येथे जातो असे सांगतच गोपनीय अहवाल अवघ्या अर्ध्या तासात व्हायरल कसा झाला? असा सवाल बाबा मोंडकर यांनी विचारून, अशीच पक्षाची घटना आहे का? असाही चिमटा कुडाळकर यांना काढला.काका कुडाळकर पर्सनेटचे एजंटपक्षात अलीकडील काळात आर्थिक गणिते घातली जात आहेत. जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना समर्थन देणारे प्रवक्ते काका कुडाळकरच पर्सनेटचे एजंट आहेत.मासेमारीचा अर्थ माहीत नसणाºया कुडाळकरांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वरदहस्ताने उन्नती साधली आणि राणेंच्या मागे ग्रहण लावले.पर्ससीनवाल्यांचे एजंट असलेल्या कुडाळकरांनी भाजपात ग्रहण लावू नये, असा सल्लाही मोंडकरयांनी दिला.
जिल्ह्यातील नेत्यांकडूनच पक्षशिस्तीची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:50 PM