शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

नितेश राणेंना मंत्रीपद मिळणार? भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 8:10 PM

शरद पवार जे म्हणतात, ते कधीच होत नाही.

कणकवली : महाराष्ट्रात आता बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीचे सरकार आले आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचाराचे असल्याने विकासाच्या गाडीला आता डबल इंजिन लागलेले आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग होईल. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याशी चांगला संवाद आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या मंत्रीपदाबद्दल तेच सांगू शकतील असे मत भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केलं. तर, सिंधुदुर्गचा पालकमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ठरवतील असेही त्यांनी सांगितले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना शेलार यांनी स्पष्ट भूमिका मांडली.आशिष शेलार हे आज, सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता त्यांनी कणकवली येथे भाजप पदाधिकाऱ्यांसोबत लोकसभा मतदार संघाबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.आशिष शेलार म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागा जिंकण्यासाठी आतापासूनच पायाभरणी आढावा बैठकीच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. हा मतदार संघ भाजपला मिळविण्यासाठी नव्हे तर तो जिंकण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. असेही ते यावेळी म्हणाले. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल ? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, त्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच उत्तर देतील असेही ते म्हणाले.पवार म्हणतात ते कधीच होत नाहीबाळासाहेब ठाकरे शिवसेना व भाजपाची युती झालेली आहे. हे सरकार स्थिर असून बहुमत सिद्ध केलेले आहे. त्यामुळे शरद पवार जे म्हणतात, ते कधीच होत नाही. कारण महाविकास आघाडी सरकार पुढील २५ वर्षे राहणार असेही ते म्हणाले होते. आता त्याचे काय झाले? बाळासाहेब ठाकरे शिवसेना व भाजप यांची दिलजमाई झाली आहे. त्यामुळे कोणाला मंत्री किंवा  पालकमंत्री बनवा अगर नको बनवू, विशेष असे काहीही  होणार नाही. मात्र,आम्ही केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून  विकासाच्या गाडीला डबल इंजिन लावून जनतेला निश्चितच दिलासा देऊ. असा विश्वासही  शेलार यांनी व्यक्त केला.ठाकरेंचा अहंकार प्रत्येक प्रकल्पाच्या आडवा येत होतासिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाने पालकमंत्री मराठा समाजाचा द्यावा, अशी मागणी केली आहे. ती व मराठा समाजाच्या अन्य मागण्या महाविकास आघाडी सरकार पेक्षा भाजपच पूर्ण करेल. यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अहंकार प्रत्येक प्रकल्पाच्या आडवा येत होत. पण, आता डबल इंजिनच्या गतीने राज्यातील महामार्ग चौपदरीकरण तसेच अन्य प्रकल्प मार्गी लावले जातील असेही सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलारNitesh Raneनीतेश राणे