सिंधुदुर्गनगरी, दि. १५ : महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकारने अवलंबिलेल्या Ease of Doing Business धोरणांतर्गत उदयोगांशी निगडीत विविध परवाना प्रक्रिया सुलभ करण्यात आल्या असून याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडून दिली जाणारी ज्ञापन स्वीकृती भाग-१ व ज्ञापन स्वीकृती - भाग २ बंद करण्यात आली असून त्याऐवजी उदयोग आधार ज्ञापन आॅनलाईन देण्याची प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. उदयोग आधार ज्ञापन नि:शुल्क असून सदर प्रक्रिया फक्त अस्तित्वात असणा-या उदयोगांनाच लागू आहे. प्रस्तावित उदयोगांना सदरची प्रक्रिया लागू नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत असणा-या उत्पादन तसेच सेवा उदयोगांना उदयोग आधार ज्ञापन स्वीकृती देणेसाठी जिल्हा उदयोग केंद्र, सिंधुदुर्ग कार्यालयाकडून दिनांक १८ एप्रिल २0१७ रोजी सकाळी ११.00 वाजता सावंतवाडी सहकारी उद्यमनगर लि., माजगांव, ता. सावंतवाडी यांचे कार्यालय, माजगांव, ता. सावंतवाडी व दिनांक १९ एप्रिल २0१७ रोजी सकाळी ११.00 वाजता पंचायत समिती कार्यालय, कणकवली येथे मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.मेळाव्यास येताना उद्योजकाचे आधार कार्ड (भागिदारी संस्था, खाजगी मर्यादित कंपनी, उत्पादक सहकारी संस्था इ. प्रकरणी प्रमूख भागिदार, व्यवस्थापकीय संचालक,अध्यक्ष इ. पदावरील व्यक्तींचे आधार कार्ड आणावे. ) उद्योजकाचे पॅनकार्ड, उदयोजकांचे नावे स्वंतंत्र पॅनकार्ड घेतले असल्यास सदरचे पॅनकार्ड. जिल्हा उदयोग केंद्र, सिंधुदुर्ग कार्यालयाकडून यापूर्वी स्थायी लघू उदयोग नोंदणी, ज्ञापन स्वीकृती भाग-१ अथवा भाग-२ घेतली असल्यास त्याची प्रत. बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोड दर्शविणा-या बँक खाते पुस्तकाच्या पानाची प्रत, आदी कागदपत्रांची मूळ प्रत व प्रत्येकी एक झेरॉक्स प्रत आणवयाची आहेया तालुक्यामध्ये आस्तित्वात असलेल्या व ज्यांना यापूर्वी उदयोग आधार नोंदणी घेतलेली नाही अशा सर्व उत्पादन उदयोगांनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उदयोग केंद्र, सिंधुदुर्ग कार्यालयाकडून करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, ए ब्लॉक, दुसरा मजला, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा.