शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

ओरोस बसस्थानकाला मान्यता

By admin | Published: November 07, 2015 10:25 PM

वैभव नाईक : परिवहनमंत्र्यांच्या हस्ते पुढील महिन्यात भूमिपूजन

सिंधुदुर्गनगरी : कित्येक वर्षे रखडलेले ओरोस बसस्थानक अखेर निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी १ कोटी २३ लाख ७७ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून याचे ई टेंडरही निघाले आहे, अशी माहिती शनिवारी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या बसस्थानकामुळे सिंधुदुर्गनगरीतील सार्वजनिक वाहन व्यवस्थेला बळकटी येणार आहे. तसेच येथे राहणाऱ्या नागरिकांची सोय होणार आहे.सिंधुदुर्गनगरीमध्ये बसस्थानकासाठी ५० गुंठे जमीन परिवहन महामंडळाकडून विकत घेण्यात आली होती. मात्र, गेली १५ वर्षे या स्थानकाचे काम सुरू होऊ शकले नव्हते. तसेच एस. टी. महामंडळाने मुंबई-गोवा महामार्गानजीक जागेची मागणी केली होती. एस. टी. ला भारमान मिळावे यादृष्टीने महामार्गावरची जागा सोयीस्कर आहे, असे मंडळाचे म्हणणे होते. मात्र, आता १५ वर्षांनंतर सिंधुदुर्गनगरीमध्ये नागरीकरण वाढले आहे. तसेच अनेक कर्मचारी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक येथून नोकरीनिमित्त स्थिरावले आहेत.त्यामुळे सिंधुदुर्गनगरीत बसस्थानक होणे ही येथील प्रमुख मागणी होती. सिंधुदुर्गनगरी पोलीस स्टेशनच्या जवळ ५० गुंठे जागेत उभारल्या जाणाऱ्या बसस्थानकाचे भूमिपूजन पुढील महिन्यात परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते केले जाणार असल्याचे आमदार नाईक म्हणाले. हे स्थानक अद्ययावत असेल तसेच डेपोसाठी दोन हेक्टर जागेची मागणी केली असल्याचेही ते म्हणाले. या कामी एस. टी. चे मुख्य अभियंता जे. बी. इनामदार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली.सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात नगरपंचायत व्हावी यासाठीचा विशेष प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठविलेला आहे. त्याला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही आमदार नाईक म्हणाले. यावेळी ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, छोटू पारकर, संजय भोगटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्ह्यासाठी १२ नवीन गाड्याकुडाळ (जुन्या) बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यासाठी शासनाकडून निधीची मागणी करण्यात आली असून विभाग नियंत्रणाकडून याचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कणकवली बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी ७० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी १२ नवीन गाड्या मंजूर झाल्या असून १० मिनी बसही देण्यात येणार आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा मिळणार आहेत.