सावंतवाडी : सुतार समाजाला सुतार समाज हादेखील समाजातील अन्य समाजाप्रमाणे वागत नसला, तरी त्या समाजाएवढेच महत्त्व आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक बाबी मेस्त्री यांनी केले. श्री विश्वकर्मा सुतार समाज मंडळ, सावंतवाडी यांच्यावतीने येथील दैवज्ञ गणपती मंदिरात विश्वकर्मा जयंती सोमवारी साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अरुण सुतार, अनिल मेस्त्री, प्रवीण माडये, शरद पांचाळ, बाबी मेस्त्री (कास), अशोक दाभोळकर, शंकर मेस्त्री, श्रीराम पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी बाबी मेस्त्री म्हणाले, सुतार समाजाला कोणताही शाप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विश्वकर्माची आपल्यावर कृपा असल्याने आपण कोणत्याही भ्रमात न राहता आपल्या कला आत्मसात केल्या पाहिजेत. सर्व कला जपल्या पाहिजेत. सुतार समाजाला सर्व प्रकारच्या कला येत असून यातून उन्नती साधली पाहिजे. शिल्पकला, लोखंडी, सोने, गाडी या सर्व वस्तू बनविण्यासाठी सुतारांचाही समावेश असून सुतार समाजाने कधीही आपल्याला कमी न लेखता एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे, असे मेस्त्री यांनी सांगितले. यावेळी सकाळी नऊ वाजता विश्वकर्माचे पूजन करण्यात आले. भजन, नामस्मरण करून थाटात जयंती साजरी करण्यात आली. तसेच महिलांसाठीही समारंभ आयोजित करण्यात आला. बाहेरगावाहून आलेल्या सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले. यावेळी दहावी व बारावीच्या उत्तीर्ण मुलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दुपारी उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यानंतर महिलांच्या फुगड्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती व चर्चाविनिमय करण्यात आला. या कार्यक्रमाला रमाकांत पांचाळ, श्रीराम पेडणेकर, संतोष मेस्त्री, अशोक मेस्त्री, अभिजीत मेस्त्री, वासुदेव मेस्त्री, प्रमोद मेस्त्री, निळकंठ मेस्त्री, उज्ज्वला कालेलकर, भास्कर मेस्त्री यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव अमिंदी मेस्त्री यांनी केले. (वार्ताहर)
अन्य समाजाप्रमाणे सुतार समाजही महत्त्वाचा
By admin | Published: February 04, 2015 10:08 PM