शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

...अन्यथा इंग्रजी भाषेतील नावांच्या पाट्याना काळे फासणार, मनसेचा इशारा

By सुधीर राणे | Published: October 12, 2023 5:11 PM

सर्वच ठिकाणी मराठी फलकांची कार्यवाही करण्याची मनसेची मागणी 

कणकवली: राज्य शासनाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने बँका, कार्यालये, दुकाने व इतर संस्था यांच्या नावाच्या मराठीतून पाटया लिहिण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबधिताना आदेश व्हावेत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना इंग्रजीमध्ये असणाऱ्या पाटयांना काळे फासेल असा इशारा मनसेने दिला. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, कुडाळ माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, राजेश टकासाळे ,अणाव माजी सरपंच आप्पा मांजरेकर, अमोल जंगले आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने सर्व व्यवहार मराठीतून होण्याकरीता वारंवार आदेश काढलेले आहेत. त्याकरीता मराठी भाषा विभाग नव्याने स्थापन केलेला आहे. त्याचप्रमाणे शासकीय कामकाजात मराठी भाषा वापरण्याकरीता व त्यावर नियंत्रण करण्याकरीता प्रत्येक विभागाला एका अधिकाऱ्याकडे जबाबदारी देण्याचा शासन निर्णय निघालेला आहे. त्या निर्णयाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही कार्यालयामध्ये मराठी भाषा नियंत्रण करणारे अधिकारी नेमलेले नाहीत. ते तातडीने नेमण्यात यावेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात दुकान,संस्था, कंपन्या ,बँका व इतर कार्यालयाच्या पाटया मराठीतून करण्याबाबत शासनाने निर्णय काढला आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मराठीतून पाटया लिहिण्याचे आदेश व्हावेत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी इंग्रजीमध्ये असणाऱ्या पाटयांना काळे फासतील. त्यातून कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला प्रशासनच जबाबदार असेल. सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करणार आहोत. याची नोंद घ्यावी. असेही या निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसे