शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'पुन्हा फसवल्यास आत्मदहनाशिवाय पर्याय नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 3:45 PM

दोडामार्गवासीयांचा इशारा; आश्वासनाअंती उपोषण मागे

सावंतवाडी : दोडामार्ग येथील केळीचे टेंब-धाटवाडी म्हावळणकरवाडी येथील रस्त्याचे खडीकरण ३० मेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असं आश्वासन तिलारी कालवा विभागाकडून स्थानिकांना देण्यात आलं आहे. याशिवाय रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम २१ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. विभागाचे कार्यकारी अभियंता  राकेश धाकतोडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर नागरिकांनी उपोषण मागे घेतलं. मात्र पुन्हा फसवणूक झाल्यास आत्मदहनाचा इशाराही नागरिकांनी दिला. तिलारीचे मुख्य कार्यालय हे सावंतवाडीत आहे. या कार्यालयासमोर स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अंकुश जाधव, दोडामार्ग तालुकाध्यक्ष रमेश दळवी, दोडामार्गचे नगराध्यक्ष संतोष नानचे, उपनगराध्यक्षा साक्षी कोरगावकर यांच्यासह अनेक नागरिक गेले दोन दिवस उपोषण करत होते. पण त्यांना ठोस आश्वासन मिळत नव्हतं. नागरिकांनी तिलारी डाव्या कालव्याजवळील दोडामार्ग येथील केळीचे टेंब-धाटवाडी म्हावळणकरवाडी येथील रस्त्याचं खडीकरण करण्याबाबत आश्वासन दिलं होतं. पण ते आश्वासन पाटबंधारे अधिकाºयांनी पाळले नाही, असा आरोप करत पुन्हा आंदोलन सुरू केलं. मात्र गेले दोन दिवस कोणताही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नसल्यानं आंदोलनकर्ते संतप्त झाले होते. त्यांनी आपला सर्व राग बुधवारी तिलारी विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे यांच्यावर काढला. तुम्हाला आंदोलनकर्त्यांची दया नाही. आम्ही येथे रस्त्यावर बसतो. जर आमच्यातील एकावर रस्त्यावरचा दगड उडाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल करत जोपर्यंत आम्हांला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र, कार्यकारी अभियंता धाकतोडे यांनी आंदोलनकर्ते संजू परब यांच्यासह नगराध्यक्ष संतोष नानचे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मात्र नंतर नागरिकांनी खडीकरणावर समाधान व्यक्त केले.खडीकरणाच्या आश्वासनाचं पत्रही कार्यकारी अभियंता धाकतोडे यांनी नागरिकांनी दिलं. यात २१ एप्रिलपर्यंत केळीचे टेंब ते म्हाळवणकरवाडी या चार किलोमीटरमधील खड्डे बुजवले जाणार असून, ३० मेपर्यंत रस्त्यावर खडीकरण केले जाणार आहे. कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे यांनी तालुकाध्यक्ष संजू परब, भाजपचे नेते राजन म्हापसेकर यांच्या उपस्थितीत आश्वासनाचं पत्र उपोषणकर्त्यांना दिलं. या उपोषणात सावंतवाडी नगरसेवक उदय नाईक, विनया म्हावळणकर, अमिना देसाई, सुनील म्हावळणकर, संदेश गवस, इंद्रायणी नाईक, मदन कुंदेकर, चंद्रकांत म्हावळणकर, सुलक्षणा म्हावळणकर यांचा सहभाग होता 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग