कणकवली : कणकवलीवासीयांना चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील या उद्यानाचे व स्पोर्ट कॉप्लेक्सचे दर्जेदार काम करून नगरपंचायतीने आणखीन एका सुविधेमध्ये भर टाकावी. असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले.कणकवली येथील बाल गोपाळ हनुमान मंदिराजवळील टेंबवाडी रोडकडील उद्यान तसेच स्पोर्ट कॉप्लेक्सच्या कामाचा भूमिपूजन सोहळा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते रविवारी झाला . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा भूमिपूजन सोहळा साध्या पद्धतीने करण्यात आला . यावेळी ते बोलत होते.यावेळी कोनशिलेचे अनावरणही करण्यात आले . यावेळी नीलम राणे , आमदार नितेश राणे , नगराध्यक्ष समीर नलावडे , भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजश्री धुमाळे , संतोष कानडे, राजन चिके, गटनेते संजय कामतेकर , नगरसेवक बंडू हर्णे , मेघा गांगण , अभिजीत मुसळे , ऍड. विराज भोसले , रवींद्र गायकवाड, प्रतीक्षा सावंत , कविता राणे , मेघा सावंत , शिशिर परुळेकर , डॉ.विद्याधर तायशेटे , प्रज्ञा ढवण , गीतांजली कामत , खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई , भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे , संदीप नलावडे , दादा कुडतरकर , निशा अंधारी, ऍड. दीपक अंधारी, लवू पिळणकर, हनिफ पिरखान , बंडू गांगण , बबलू सावंत, भालचंद्र कुलकर्णी ,महेश सावंत, अभय राणे ,किशोर राणे, दिलीप मालंडकर आदि उपस्थित होते .कणकवली शहरात मुंबई - गोवा महामार्गालगत असलेले श्रीधर नाईक उद्यान चौपदरीकरणाच्या कामात बाधित झाले आहे. त्यामुळे शहरवासीयांना सुसज्ज गार्डनची उणीव भासत होती . नगरपंचायतीच्या निवडणुकी दरम्यान शहरवासीयांना दर्जेदार सुविधा देण्याचे आश्वासन आम्ही दिले होते . त्या आश्वासनाची पूर्तता करत असल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी भूमिपूजन सोहळ्यानंतर व्यक्त केली .तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे , आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून यापुढेही कणकवली शहरात नावीन्यपूर्ण व दर्जेदार सुविधा देण्यात येतील . आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून नगरपंचायतला मिळालेला कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा पुतळा या स्पोर्ट क्लब मध्ये उभारण्यात येणार आहे . ७४ गुंठे जागेत हे काम साकारणार आहे . या कामातील पहिल्या टप्प्याचा भूमिपूजन सोहळा आज झाला आहे . १५ कोटीचा हा प्रकल्प आहे . त्यापैकी पहिल्या टप्यात साडेचार कोटीचे काम होणार आहे . दुसऱ्या टप्यात ९ .५० कोटीचे काम होणार असून , त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे . त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर ते कामही कार्यारंभ आदेश देत सुरु करण्यात येणार असल्याचे समीर नलावडे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम सावंत यांनी केले.फोटो ओळ - कणकवली येथील उद्यान व स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या कामाचे भूमिपूजन रविवारी नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे, नीलम राणे, समीर नलावडे , राजन तेली आदी उपस्थित होते. (अनिकेत उचले )