बांदा : पाडलोस व दांडेलीत गव्यांचा कळप रस्त्यानजीक असलेल्या काजू बागायतीत बिनधास्त घुसूून नासधूस करीत आहे. तर काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला दुचाकीचालकांना निदर्शनास येत आहे. यामुळे रस्त्यावरून शेतात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. त्यामुळे वनविभागाने एक तर अशा उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करावा किंवा शेतकऱ्यांना थेट शेतावरच भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतक-यांमधून होत आहे.
गेल्या महिन्यात पाडलोस केणीवाडा येथे अंगणात बसलेल्या शेतकºयाचा गव्याने पाठलाग केला. तसेच भुईमूग, माड, काजू, पोफळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. अशा घटना ताज्या असताना पुन्हा एकदा दांडेली येथील शेतात चार ते पाच गव्यांनी काजू बागायतीत घुसून नुकसान केल्याचे शेतकरी उत्तम परब यांनी सांगितले.
तसेच जंगलमय भाग असल्याने तेथून ये-जा करताना जीव मुठीत धरून बाजार किंवा घर गाठावे लागत आहे. सध्या काजूचा हंगाम सुरू असून शेतकºयांना बागायतीत जाण्याशिवाय पर्याय नाही. वनविभागाने शेतक-यांच्या काजू वाचविण्यासाठी अशा उपद्रवी गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.
मडुरा येथून जीवनाश्यक वस्तू खरेदी करून येत असताना बांदा शिरोडा मार्गावरील केणीवाडा (डोंगराची कोंड) येथे सुमारे दहा गवे दुचाकीचालक हर्षद परब व अजित कोरगावकर यांना शनिवारी दृष्टीस पडले. रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या काजू बागायतीत गव्यांचा कळप पाहून ते घाबरले. परंतु त्यांनी हुशारीने त्यांना हुसकावून लावले. अशा घटना वारंवार होत असून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांच्या जीवास पर्यायाने शेती उत्पादनालाही धोका निर्माण झाला आहे. या गव्यांचा त्वरित बंदोबस्त करावा.
प्रशासनाने शेतक-यांकडे लक्ष द्यावेकोरोनाच्या संकटाला सामोरे जात असता एकीकडे काजू बियांच्या दरात होणारी घट आणि दुसरीकडे गव्यांकडून काजूचे होणारे नुकसान यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकºयावर आर्थिक संकट ओढवले आहे. या अवस्थेत असलेल्या शेतक-याने करावे तरी काय? असा सवाल सर्वसामान्य शेतक-यांतून होत आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन गव्यांचा बंदोबस्त करून आमच्या काजू बागायती वाचवाव्यात, अशी मागणी पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल यांनी केली आहे.