शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सिंधुदुर्गातील पॅनकार्ड गुंतवणूकदारांची समिती गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 4:49 PM

पॅनकार्ड कंपनीने आपला गाशा गुंडाळल्यानंतर हवालदिल झालेले गुंतवणूकदार व एजंट यांनी समिती गठीत केली आहे. ही समिती आता आपले पैसे परत मिळावेत यासाठी कंपनीविरोधात लढाई लढत आहे. राष्ट्रशक्ती संघटनेने या गुंतवणूकदारांना साथ दिली असून ठेवी परत मिळेपर्यंत गुंतवणूकदारांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन राष्ट्रशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) दारवटकर यांनी दिले आहे.

ठळक मुद्दे गुंतवणूकदारांना राष्ट्रशक्ती संघटनेचा दिलासाबैठकीला सिंधुदुर्गातील ८00 गुंतवणूकदार व २00 एजंट उपस्थित

कणकवली,10 : पॅनकार्ड कंपनीने आपला गाशा गुंडाळल्यानंतर हवालदिल झालेले गुंतवणूकदार व एजंट यांनी समिती गठीत केली आहे. ही समिती आता आपले पैसे परत मिळावेत यासाठी कंपनीविरोधात लढाई लढत आहे. राष्ट्रशक्ती संघटनेने या गुंतवणूकदारांना साथ दिली असून ठेवी परत मिळेपर्यंत गुंतवणूकदारांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन राष्ट्रशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) दारवटकर यांनी दिले आहे.

सिंधुदुर्गातील पॅनकार्ड कंपनीचे गुंतवणूकदार व एजंट यांची बैठक येथील दुर्गाराम मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीला राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मुकुटराव मोरे, नंदकुमार गावडे, नकुल पार्सेकर व राष्ट्रशक्ती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी संदीप उंबळकर व सचिवपदी सचिन वैद्य यांची निवड करण्यात आली आहे.

पॅनकार्ड कंपनीचे एकूण गुंतवणूकदार ५५ लाख असून महाराष्ट्रात २५ ते ३0 लाख गुंतवणूकदार आहेत. न्यायालयीन लढाईनंतरही पैसे न मिळाल्यामुळे लोकांना पैसे मिळवून देण्याची जबाबदारी पुणे येथील राष्ट्रशक्ती संघटनेने घेतली आहे. राष्ट्रशक्ती संघटना गुंतवणूकदारांना आता मदत करणार आहे.प्रास्ताविक मुकुटराव मोरे यांनी केले.

नकुल पार्सेकर यांनी पॅनकार्ड व राष्ट्रशक्ती यांचा संबंध कसा आला याबाबत माहिती दिली. पॅनकार्डच्या शेवटच्या गुंतवणूकदाराला पैसे मिळेपर्यंत राष्ट्रशक्ती संघटना गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही ज्ञानेश्वर दारवटकर यांनी दिली. बैठकीला सिंधुदुर्गातील ८00 गुंतवणूकदार व २00 एजंट उपस्थित होते.

पॅनकार्डच्या गुंतवणूकदारांनी यापूर्वी अनेकवेळा आंदोलने करून आवाज उठविला होता. मात्र एजंटांनी आता संघटित होऊन राष्ट्रशक्तीचा आधार घेतल्यामुळे लढ्याला यश येईल, अशी आशा आता समितीच्या पदाधिकाºयांना वाटत आहे. आभार नंदकुमार गावडे यांनी मानले.