ओरोस : दीर्घकालीन प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्या मान्य करून घेण्यासाठी तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने बुुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे आणि त्या मागण्या मान्य न झाल्यास २६ एप्रिलपासून तलाठी मंडळ अधिकारी बेमुदत संपावर जाणार आहेत.रत्नागिरी-सिंधुुदुर्ग तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महामंडळाचे अध्यक्ष एस. व्ही. गवस, सरचिटणीस डी. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मोेठ्या संख्येने आज तलाठी व मंडळ अधिकारी यावेळी उपस्थित होते. तलाठी सजांची व महसूल मंडळांची पुनर्रचना करावी. सातबारा संगणकीकरण व ई फेरफारमधील अडचणी दूर कराव्यात, तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण देण्यात यावे. अवैध गौण खनिज, वसुलीच्या कामातून तलाठी संवर्गास वगळावे, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय बांधून द्यावे. २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवावीत, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)
तलाठ्यांचे धरणे आंदोलन
By admin | Published: April 20, 2016 10:46 PM