शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

नायलॉनच्या जाळीत अडकले दुर्मिळ खवले मांजर, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली सुटका

By अनंत खं.जाधव | Published: August 29, 2022 4:22 PM

घराशेजारील अंगणात नायलॉनच्या जाळीत अडकले होते खवले मांजर

सिंधुदुर्ग: दोडामार्ग तालुक्यातील उगाडे येथे नायलॉनच्या जाळीत दुर्मिळ खवले मांजर अडकल्याचे आढळून आले. याबाबत शेतकरी सखाराम राणे यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर दोडामार्ग वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत खवले मांजरास ताब्यात घेतले. यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याला सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. खवलेमांजराची मोठ्याप्रमाणात तस्करी होत असतना राणे यांच्या प्रामाणिकपणामुळे खवले मांजर जीवदान मिळाले.उगाडे येथील शेतकरी सखाराम राणे यांच्या घराशेजारील अंगणात खवले मांजर नायलॉनच्या जाळीत अडकले होते. राणे यांच्या ते निदर्शनास येताच त्यांनी दोडामार्ग वनविभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय दोडामार्गचे बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. अन् नायलॉनच्या जाळीत अडकलेल्या खवले मांजराची सुटका केली. पुढील वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी त्यास वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. तेथे त्याची वन पशुवैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत तपासणी करुन त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हे खवलेमांजर पुर्णतः निरोगी असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.कोकणातील या दुर्मिळ अशा वन्यजीवाची मोठ्याप्रमाणात तस्करी होत असते. मात्र राणे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे वनविभागाने त्यांचे आभार मानून बक्षीस देखील दिले. यावेळी वनक्षेत्रपाल दोडामार्ग मदन क्षीरसागर, वनपाल माणेरी संग्राम जितकर, वनमजुर विश्राम कुबल, नारायण माळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग