कणकवली : योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४३ व्या पुण्यतिथी महोत्सवास गुरुवार पासून येथील आश्रमात भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थानी फुलांची आरास करण्यात आली होती.
दरवर्षी हा उत्सव शहरातील भक्तांसाठी आनंदाची पर्वणीच असते. मात्र , कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अगदी साधेपणाने संस्थानच्या पदाधिकारी व ब्रम्हवृदांच्या काही मोजक्याच उपस्थितीत धार्मिकविधीस प्रारंभ करण्यात आला.गुरुवारी पहाटे समाधीपूजन, काकड आरती,तसेच सर्व भक्तांच्या कल्याणार्थ भालचंद्र महारूद्र महाअभिषेक अनुष्ठान या धार्मिक विधीस ब्रम्हवृदांच्या हस्ते सुरवात करण्यात आली.यावेळी भालचंद्र संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत,सचिव अशोक सापळे,खजिनदार दादा नार्वेकर,सदस्य प्रसाद अंधारी,अँड प्रवीण पारकर,व्यापारी विजय पारकर,व्यवस्थापक विजय केळुसकर,बाळा सापळे,श्रीरंग पारगावकर आदी उपस्थित होते.
त्यानंतर दुपारी आरती,सुश्राव्य भजने आदी कार्यक्रम झाले. यावेळी भक्तांनीहि सोशल डिस्टनसिंग राखत कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळत दर्शन घेतले. पुढील ४ दिवस धार्मिक विधी व दैनंदिन कार्यक्रम सुरु राहणार असून भाविकांनी गर्दी टाळावी. कोरोना पार्श्वभूमीवर महाप्रसाद तसेच सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे संस्थानच्यावतीने सांगण्यात आले.