शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

पारंपारिक मच्छिमारांची नेत्यांकडून कायम दिशाभूलच: परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 7:08 PM

पारंपारिक मच्छिमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्या काहीजणांनी या मच्छिमारांची कायमच दिशाभूल केली आहे. फक्त संघर्षासाठी पारंपारिक मच्छिमाराना वापरून घेऊन न्याय मात्र कधीही मिळवून दिलेला नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा पारंपारिक मच्छिमारानी आता तरी विचार करावा आणि सावध व्हावे .असे आवाहन मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देपारंपारिक मच्छिमारांची नेत्यांकडून कायम दिशाभूलचपरशुराम उपरकर यांची टीका

कणकवली : पारंपारिक मच्छिमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्या काहीजणांनी या मच्छिमारांची कायमच दिशाभूल केली आहे. फक्त संघर्षासाठी पारंपारिक मच्छिमाराना वापरून घेऊन न्याय मात्र कधीही मिळवून दिलेला नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा पारंपारिक मच्छिमारानी आता तरी विचार करावा आणि सावध व्हावे .असे आवाहन मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर पुढे म्हणाले, श्रमिक मच्छिमारांचे पदाधिकारी व पारंपारिक मच्छिमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी प्रथम टॉलर्स त्यांनतर अत्याधुनिक पर्ससीननेट , गिलनेट व आता एलईडी फिशिंग असा संघर्ष पारंपारिक मच्छिमारांसाठी तयार केला.मात्र, नेतेगिरी मिरवणाऱ्या या नेत्यांनी पारंपारिक मच्छिमारांसोबत कोणतीही बैठक न घेता आगामी निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानाला पाठींबा देण्याचा परस्पर निर्णय जाहीर केला आहे. या हंगामातील मच्छिमारी ३१ मे रोजी संपणार असताना एक आठवड्यापूर्वी हा निर्णय घेऊन त्यांनी कोणाचा स्वार्थ साधला?पारंपारिक मच्छिमारांनी मेळावा घेऊन अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मतदानाच्या दोन दिवस आधी तो निर्णय बदलणारे कोण होते? हे पारंपारिक मच्छिमारांनी शोधण्याची गरज आहे.आचरा येथील आंदोलनात ९३ पारंपारिक मच्छिमारांवर गुन्हा दाखल करणारे व पारंपारिक मच्छिमार आता स्वाभिमान पक्षात एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणार का? हा खरा प्रश्न आहे. आतापर्यंत पारंपारिक मच्छिमारांच्या संघर्षात ज्यांनी दरोडे किंवा खुनाचा प्रयत्न असा गुन्हा अंगावर घेतला त्या मच्छिमारांचे आता पुढे काय होणार? याचा विचार होणे आवश्यक आहे.स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष पंधरा वर्षे पालकमंत्री होते तर आता भाजपचे खासदार आहेत. गेल्या दोन वर्षात किंवा त्यापूर्वी त्यांनी पारंपारिक मच्छिमारांच्या प्रश्नासाठी केंद्र शासनाजवळ काय प्रयत्न केले? त्याचबरोबर खासदार विनायक राऊत , केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू , अनंत गीते यांनी गेल्या ४ वर्षात काय उपाययोजना केल्या आहेत ? मग यापूर्वी काहीही करू न शकलेले हे नेते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तरी काय प्रयत्न करणार आहेत?एलईडी बारा नॉटिकलच्या बाहेर मच्छिमारी करीत असल्याने हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. त्यावर शासनाला निर्णय घेण्यास लावण्याऐवजी खासदार विनायक राऊत केंद्रीय मंत्र्यांकडे एलईडी फिशिंग करणाऱ्यांना घेऊन गेले. ही शोकांतिका आहे.पारंपारिक मच्छिमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी स्वाभिमानला पाठींबा देताना त्या पक्षाच्या किती सदस्यांच्या एलईडी पर्ससीननेट आहेत हे अभ्यासले नाही का ? त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या पक्षात आधुनिकीकरणाच्या नावाखाली मच्छिमारी करणारे आहेत. त्याना पाठींबा देऊन पारंपारिक मच्छिमारांचे नेते कोणाला न्याय मिळवून देणार आहेत.पालकमंत्री असताना नारायण राणे यांनी आधुनिकतेची कास धरणारे असे ज्यांच्याबद्दल सांगितले त्यांनीच पर्ससीननेट धारकांची संस्था निर्माण केली आहे . त्याच नेत्यांनी आता एलईडीमुळे पर्ससीननेट चालत नसल्याने व्यवसायातून मुक्त होवून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर आता पारंपारिक मच्छिमारांना उपदेश करून राजकारणातून आपले पुनर्वसन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. हे सर्व जनतेला माहीत आहे.श्रमिक जीव रापण मच्छिमार संघटनेच्या अध्यक्षानी स्वाभिमान पक्षाला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत काम करणारे आणि पारंपारिक मच्छिमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्या श्रमिक जीव रापण मच्छिमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व नॅशनल फिश वर्कर्स फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत आपली भूमिका काय आहे? ते जाहीर करावे .असे ही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग