शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

आंदोलनावर पालक ठाम

By admin | Published: June 21, 2016 12:43 AM

उपोषण लांबणीवर : सावंतवाडी मिलाग्रीसमधील शिक्षक बदलीप्रकरण

सावंतवाडी : येथील मिलाग्रीसच्या मराठी प्रायमरी स्कूलचे शिक्षक दिनेश खोत यांची बदली रद्द करा, या मागणीसाठी पालकांनी मंगळवारपासून पुकारलेले उपोषण पुढे ढकलण्यात यावे, अशी विनंती प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केली होती. त्याला पालकांनी योग्य प्रतिसाद देत उपोषण पुढे ढकलू, मात्र शाळेत मुले न पाठवण्याचा निर्णय कायम असल्याचे स्पष्ट केले.मिलाग्रीस प्रायमरीचे शिक्षक दिनेश खोत यांच्या बदलीवरून उद्भवलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पोलिस निरीक्षक शंकर पाटील, तहसीलदार सतीश कदम, माजी आमदार राजन तेली यांच्यासह पालक व संस्थेचे पदाधिकारी अ‍ॅड. मनवेल डिसिल्व्हा आदी उपस्थित होते.या बैठकीत अ‍ॅड. डिसिल्व्हा यांनी संस्थेची बाजू मांडली. यात संस्थेला शिक्षक दिनेश खोत यांची बदली रद्द करता येणार नाही. यापूर्वीही अनेक शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत, असा खुलासा केला. तसेच शिक्षक खोत यांनी बदली रद्द करण्यासाठी न्यायालयात जावे, अशी सूचना केली. यावर पालकांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत शिक्षक खोत यांची बदली रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. प्रांताधिकारी इनामदार व तहसीलदार कदम यांनी संस्थेची भूमिका मांडत असताना तुम्ही विद्यार्थ्यांचा विचार करा, असा सल्ला दिला. विद्यार्थ्यांना जर शाळेत पाठवले नाही, तर तुम्ही शिकवणार कोणाला, असा सवाल करीत शिक्षक खोत यांच्या बदलीबाबत तोडगा काढा. तुम्ही बदलीला स्थगिती तरी द्या अन्यथा बदली रद्द करा, असा पर्याय संस्थेसमोर ठेवला. शिक्षक बदलीवरून कायदा सुव्यवस्था बिघडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासन म्हणून आमचे ते काम आहे. त्यामुळे वेळीच निर्णय घ्या, अशी सूचना त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.त्यावर अ‍ॅड. मनवेल डिसिल्व्हा यांनी बदली रद्द करण्याबाबतचा विषय संचालकांचा आहे. तो आम्ही आता घेऊ शकत नाही. आम्हाला तीन दिवसांचा कालावधी द्या, अशी विनंती प्रांताधिकाऱ्यांकडे केली. त्यावर प्रांताधिकारी यांनी पालकांशी चर्चा करत आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती केली. यावर उपोषण पुढे ढकलू मात्र, मुले पाठविण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचे पालकांनी स्पष्ट केले. मात्र, यावर संस्थेच्या शिक्षिका अनिता गावडे यांनी आक्षेप घेतला. तुम्ही मुले पाठवा, निर्णय लवकर होईल, असे सांगण्याचा प्रयत्न केला; पण पालकांनी याला विरोध केला. या बैठकीला पालकांच्यावतीने प्रथमेश चोडणकर, गुरूनाथ घाडी, अन्नपूर्णा कोरगावकर, प्रणिती वर्तक, शहरअध्यक्ष आनंद नेवगी, विराग मडकईकर, भाऊ पोकळे, सद्गुरू पिळणकर, निशांत तोरस्कर, नरेंद्र मिठबावकर, अशोक बोलके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)राजन तेली : ...अन्यथा आंदोलनाचे नेतृत्व मी करेनमाजी आमदार राजन तेली यांनी संस्थेने योग्य ती भूमिका घ्यावी. आम्ही संस्था पदाधिकाऱ्यांचा आदर करतो. त्यांनी पालकांचा अनादर करू नये. अन्यथा आम्हाला वेगळे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा दिला. तसेच पालक शांत आहेत याचा कोणी गैरअर्थ काढू नये. अन्यथा पालकांच्या आंदोलनात मी स्वत: सहभागी होऊन आंदोलनाचे नेतृत्व करेन, असा इशाराही तेली यांनी यावेळी दिला. ‘त्या’ शिक्षकाला हजर करून घेण्याचा प्रयत्नमराठी प्रायमरीचे शिक्षक खोत यांची मालवणला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी बारदेस्कर या शिक्षकाची मालवण येथून सावंतवाडीत बदली झाली आहे. त्यांना तातडीने हजर करून घेण्यात यावे, असा तगादा संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मराठी शाळेच्या सिस्टरकडे लावला आहे. मात्र, त्याला पालकांनी तीव्र विरोध केला.