शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

अर्धवट प्रकल्प वर्षाअखेर पूर्ण!

By admin | Published: June 05, 2016 10:36 PM

दीपक केसरकर : ओरोस येथील कार्यशाळा उत्साहात; सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास हेच ध्येय

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविताना मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करून महाराष्ट्रात सिंधुदुर्ग सर्वांगीण विकास असलेला जिल्हा बनविणे हेच माझे ध्येय आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील गेल्या कित्येक वर्षांपासून अर्धवट राहिलेले प्रकल्प वर्षाअखेर पूर्ण केले जातील, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी शरद भवन येथील कार्यशाळेत केले. ओरोस येथील शरद कृषी भवन येथे रविवारी चांदा ते बांदा आराखडा, कोकण ग्रामीण विकास पर्यटन आराखडा सादरीकरण, माझं गावं माझा विकास योजना सादरीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, आमदार वैभव नाईक, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, रचना संसद इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ए. डी. चिटणीस, चांदा ते बांदाच्या उच्चस्तरीय समितीचे सदस्य लीना बनसोड, नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, बबन साळगावकर, सभापती सुचिता वजराठकर, शुभांगी पवार, रवींद्र जोगल, माजी आमदार प्रमोद जठार, ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, जिल्हा परिषद सदस्या सुकन्या नरसुले, जान्हवी सावंत यांच्यासह अधिकारी, खातेप्रमुख, ग्रामसेवक, सरपंच, आदी ८०० जण उपस्थित होते.केसरकर म्हणाले, पर्यटन व शेती समृद्धीतून आपल्याला आर्थिक विकास साधावयाचा आहे. दरडोई उत्पन्नात जिल्हा पुढारलेला आहे असे म्हणताना जिल्ह्यातील ४० हजार दारिद्र्यरेषेखालील जनता विसरून चालणार नाही. म्हणून केवळ पर्यटन नाही, तर शेतीतूनही जिल्हा समृद्ध झाला पाहिजे. त्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. वरील चारही योजनांच्या सादरीकरणाचा सर्वांनी सर्व दृष्टिकोनातून विचार करावा व आपला गाव आदर्श पर्यटन गाव करण्याचा प्रयत्न करावा आणि आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहनही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर म्हणाले, सिंधुदुर्गासाठी हा सुवर्णक्षण आहे. असे सांगून विकास आराखड्याच्या माध्यमातून खूप चांगल्या संधी ग्रामीण भागात उपलब्ध होणार आहेत. त्याचा तेथील ग्रामस्थांनी फायदा करून घ्यावा. मात्र, पर्यटनस्थळांची जाहिरात करताना फसवेगिरी असू नये, असेही ते म्हणाले.आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्गची लोकसंख्या वर्षानुवर्षे कमी होत आहे. सिंधुदुर्गातील रोजगाराची कमतरता हेच कारण प्रामुख्याने पुढे येते. म्हणून या माध्यमातून रोजगार वाढल्यास येथील जनता पुन्हा स्थिरावेल अशी आशा असल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह व रचना संसदचे अध्यक्ष ए. डी. चिटणीस यांचीही समयोचित भाषणे झाली. (प्रतिनिधी) अधिकाऱ्यांचे लाड आता खूप झालेकार्यशाळा सुरू झाली आणि सभागृहात विजेचा लपंडाव सुरू झाला. बंदिस्त सभागृहात उपस्थित कासावीस व्हायला लागले. त्यावेळी वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या विशेष कार्यशाळेच्या कार्यक्रमात असा हलगर्जीपणा करणे हे योग्य नसून या अधिकाऱ्यांना याची किंमत चुकवावीच लागेल. गेल्या दीड वर्षात अधिकाऱ्यांचे खूप लाड केले. मात्र, यापुढे तसे लाड न करता काम करा, अन्यथा दुसऱ्या जिल्ह्यात बदलीसाठी तयार व्हा, असा सज्जड दमही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.