सावंतवाडी : पनवेलनजीक घसरलेल्या मालगाडीमुळे कोकण रेल्वे वाहतुकीला चांगलाच फटका बसला आहे. काही गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे, त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.त्यामुळे सावंतवाडीतील मळगाव रेल्वे स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून परतीचा प्रवास करणारे अनेकजण अडकून पडले आहेत
शनिवारी पनवेल येथे मध्य रेल्वेच्या मालगाडीचे डबे घसरले. ते बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र त्यामुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकाला चांगलाच फटका बसला आहे. काही गाड्या स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.तर काहि रेल्वे गाड्या या उशिरापर्यंत रद्द करण्या बाबत निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरचे वेळापत्रक कोलमडले आहे.
या सर्वाचा मोठा फटका हा गणेश चतुर्थी साठी आलेले चाकरमानी हे परतीच्या मार्गावर आणि ऐनवेळी हा प्रकार घडल्याने सर्व स्थानकात गर्दी झाली आहे.हा प्रकार घडल्यानंतर रेल्वे ने कोणतीही माहिती दिली नाही.तसेच काहि रेल्वे गाड्या रद्द केल्या हे ही कळविण्यात आले नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले.
रेल्वे च्या या गलथान कारभारामुळे प्रवाशी चांगलेच संतप्त झाले त्यामुळेच ठाण्यात प्रवाशांकडून रेल रोको आंदोलन छेडण्यात आले होते.ठिकठिकाणी प्रवाशाचा उद्रेक झाला तसाच प्रकार सावंतवाडीत होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
वेगवेगळ्या रेल्वे गाड्या साठी मळगाव स्थानकात प्रवाशी आले असून ते दिवसभर स्थानकात च ताटकळत उभे होते.कोणती गाडी कधी येईल याची माहिती नसल्याने प्रवाशाचा भावनाचा उद्रेक होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून स्वता पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे प्रवाशांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देतना दिसत आहेत.