- अनंत जाधव सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भविष्यातील राष्ट्रीय वारे कळत असते. त्यामुळेच त्यांना कदाचित बारामतीमधील पराभव दिसू लागला असेल, म्हणूनच ते ईव्हीएम मशीनबद्दल शंका उपस्थित करून पराभवापूर्वी मैदान तयार करत आहेत, असा टोला मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी हाणला. सावंतवाडी येथे बुधवारी एका खासगी कार्यक्रमासाठी मंत्री कांबळे आले असता येथील विश्रामगृहावर ‘लोकमत’ संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना भरीव मदत केली आहे. त्यामुळे दुष्काळाची झळ बसणार नाही. यासाठी सरकार पूर्ण क्षमतेने काम करत असून, ११ जूनपर्यंत पाऊस महाराष्ट्रात येईल, अशी शक्यताही मंत्री कांबळे यांनी व्यक्त केली. मंत्री कांबळे म्हणाले, राज्यात मागील निवडणुकीपेक्षा एक जागा किती जास्त येईल तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल यात कोणतीही शंका नाही. देशातील विरोधी पक्षातील अनेक नेते आपण पंतप्रधान होऊ अशा अपेक्षेने आहेत.मात्र त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहील. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे तेरा दिवसात भाजप सरकार कोसळेल, असे सांगत आहेत. त्यामुळे त्यांचीही पंतप्रधानपदासाठी महत्त्वाकांक्षा दिसून येते. त्यामुळेच ते गैरसमज पसरवत आहेत. मात्र, नरेंद्र्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार देशात स्थापन होईल यात कोणतीही शंका नाही, असे मंत्री कांबळे म्हणाले.शरद पवार यांना भविष्यातील राजकारणाच्या वाºयाची दिशा कळत असते असे बोलले जाते. त्यावरूनच त्यांनी ईव्हीएम मशीनबद्दल संशय व्यक्त केला असेल. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार हे निश्चित आहे. त्यामुळे या पराभवामागची कारणे अगोदरच शोधून ठेवत आहेत. त्यामुळे मैदान तयार होईल, असा त्यांचा समज आहे. पण पवार यांच्या घरातच ईव्हीएमवरून मतभेद आहेत, असेही मंत्री कांबळे यांनी सांगितले.राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. या दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र्र सरकारने महाराष्ट्र सरकारला भरीव अशी मदत केली आहे. त्यामुळे दुष्काळाबाबत अनेक निर्णय घेण्यास सोपे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनीही दुष्काळाबाबतचा आढावा घेण्यासाठी थेट सरपंचांशी संवाद साधला. त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यामुळे दुष्काळाबाबत सत्य काय ते समजले आणि सरकारला दुष्काळग्रस्त जिल्हे जास्तीत जास्त मदत करण्यात यश आले आहे. सरकारने तहसीलदारांना दुष्काळाबाबतचे जास्तीत जास्त अधिकार दिले आहेत. त्यामुळे दुष्काळाची सर्वत्र चांगली कामे सुरू असल्याचे मंत्री कांबळे यांनी सांगितले. दुष्काळाची झळ १४ जिल्ह्यांनाराज्यातील दुष्काळाची झळ १४ जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात बसली आहे. त्यामुळे तेथील दुष्काळग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचे काम सुरू असून, दोन रुपये किलोने गहू, तांदूळ याचा पुरवठा केला जात आहे. चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. आम्ही १५ जूनपर्यंतच्या सर्व अंमलबजावणीचे नियोजन केले असल्याचे मंत्री कांबळे यांनी सांगितले. ११ जूनपर्यंत पाऊस महाराष्ट्रात येईल स्कायमेटच्या अंदाजानुसार ४ जूनला पाऊस केरळमध्ये येईल. त्यानंतर तो दहा ते अकरा जूनपर्यंत महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. मात्र पाऊस लांबला तरी आमचे पूर्ण लक्ष दुष्काळग्रस्त जिल्ह्यांकडे आहे, असे मंत्री कांबळे यांनी सांगितले
पवार बारामतीतील पराभवापूर्वीचे मैदान तयार करताहेत, मंत्री दिलीप कांबळे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 7:43 PM