शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चार ट्रॉलर्सवर दंडात्मक कारवाई

By admin | Published: May 05, 2015 10:22 PM

मालवण तहसीलदारांचा आदेश : सागरी अधिनियमांचे उल्लंघन

मालवण : सागरी अधिनियमांचे उल्लंघन करून मालवणच्या समुद्रात ४ ते ५ वावात पर्ससीनद्वारे मच्छिमारी करणाऱ्या गोवा आणि रत्नागिरी येथील सहा ट्रॉलर्सवर कारवाई करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने प्रतिवेदने दिल्यानंतर मंगळवारी मालवण तहसीलदारांनी चार ट्रॉलर्सवर दंडात्मक कारवाई केली तर दोन ट्रॉलर्सची आवश्यक ती कागदपत्रे सादर केली गेल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकली नाही.दरम्यान, गोव्याच्या पर्ससीन तीन ट्रॉलर्सना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा तर रत्नागिरी-साखरी नाटे येथील एका ट्रॉलर्सला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी गोव्याच्या ट्रॉलर्सनी मालवणच्या समुद्रात पडलेली मच्छिमारी जाळी शोधण्याची मोहीम हाती घेतली.रविवारी सायंकाळी मालवणच्या समुद्रात ४ ते ५ वाव पाण्यात पर्ससीनद्वारे मच्छिमारी करणाऱ्या ट्रॉलर्सचा पाठलाग करीत स्थानिक पारंपरिक मच्छिमारांनी सहा ट्रॉलर्स पकडले होते. या प्रकारात पर्ससीन ट्रॉलर्स व पारंपरिक मच्छिमार यांच्यात वाद झाला होता. या वादाचे रुपांतर प्रांतवादात झाले होते. त्याचे पडसाद गोवा राज्यातही उमटले.पारंपरिक मच्छिमारांनी पकडलेले हे सहा ट्रॉलर्स मालवण धुरीवाडा येथील समुद्रात उभे करून ठेवण्यात आले होते. यातील चार ट्रॉलर्सनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी या सहाही ट्रॉलर्सवर कारवाई करण्याच्या दृष्टीने मालवणच्या मत्स्य व्यवसाय विभागाने तहसील कार्यालयात प्रतिवेदने सादर केली होती. ही कारवाई मालवण मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी सुरेंद्र गावडे यांनी केली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ नुसार करण्यात आलेल्या कारवाईत साखरीनाटे रत्नागिरी येथील सफवान बशीर पंगेरकर (ट्रॉलर्सचे नाव - महम्मद सन्ननान), मोहम्मद शफसद्दीन वाडकर (ट्रॉलर्सचे नाव -अलअमीर), आसिफ महम्मद म्हसकर (टॉलर्सचे नाव - महम्मद अमीर अयुब) तसेच गोवा येथील फ्रान्सीस फर्नांडिस व लॉरेन्स पिंटो (ट्रॉलर्सचे नाव - सेंट फ्रान्सीसा), ब्राझिलिया फर्नांडिस (ट्रॉलर्सचे नाव - सेंट अ‍ॅन्थोनी) आणि आयवो डिसिल्व्हा (ट्रॉलर्सचे नाव - ए. एम. सिल्व्हा) यांच्या विरूद्ध प्रतिवेदने सादर करण्यात आली.मंगळवारी मालवणचे प्रभारी तहसीलदार खडपकर यांच्यासमोर या सहाही पर्ससीन ट्रॉलर्स मालकांची सुनावणी झाली. या सुनावणीत आसिफ म्हसकर आणि मोहम्मद वाडकर यांनी मच्छिमारी करण्याचा परवाना व इतर कागदपत्रे सादर केल्याने या दोघांना दंड ठोठावण्यात आला नाही तर सागरी नाटे येथील सफवान पंगेरकर यांनी कागदपत्रे सादर न केल्याने त्यांना दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला.गोवा येथील ट्रॉलर्स मालकांजवळ महाराष्ट्रात मच्छिमारी करण्याचा परवाना आढळून आला नाही. त्यामुळे गोवा येथील फ्रान्सीस फर्नांडिस, ब्राझिलिया फर्नांडिस आणि आयव्हो डिसिल्व्हा यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा दंड सायंकाळी भरण्यात आला. पोलीस संरक्षणात ट्रॉलर्स मालकमालवणच्या समुद्रात रविवारी पर्ससीन ट्रॉलर्स व पारंपरिक मच्छिमार यांच्यात सी वॉर घडल्यानंतर सिंधुदुर्गसह गोवा राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर गोव्याच्या मत्स्य व्यवसाय अधिकारी, पोलीस अधिकारी व संबंधित ट्रॉलर्स मालकांची बैठक घेतली. त्यानुसार या ट्रॉलर्स मालकांना पोलीस संरक्षण देण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी गोव्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन नाईक यांच्या नेतृत्वाखाली सहा पोलिसांचे पथक मालवणात दाखल झाले. या पोलीस पथकासमवेत ट्रॉलर्स मालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)पोलीस निरीक्षकांकडून कानउघाडणी; फाटक्या जाळ्यामुळे तणावमंगळवारी मत्स्य विभागाने कारवाई केलेल्या सहाही पर्ससीन ट्रॉलर्सचे मालक मालवणात दाखल झाले. या ट्रॉलर्स मालकांनी मालवणचे पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बुलबुले यांनी या ट्रॉलर्स मालकांची कानउघाडणी करताना यापुढे सागरी अधिनियमांचे उल्लंघन करू नये तसेच केल्यास कारवाई करू असे सांगितले.रविवारी मालवणच्या समुद्रात गोवा, रत्नागिरीचे पर्ससीन ट्रॉलर्स आणि स्थानिक पारंपरिक मच्छिमार यांच्यात जे ‘सी वॉर’ घडले त्यानंतर प्रांतवाद मोठ्या प्रमाणावर उफाळून आला. या प्रांतवादावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने गोवा आणि सिंधुदुर्गच्या मच्छिमारांची समन्वय बैठक घेण्यात यावी असे सोमवारी ठरविण्यात आले होते. तशा आशयाचे संदेश मत्स्य व्यवसाय आणि पोलीस यंत्रणेला देण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी मालवण पोलीस ठाण्यात समन्वय बैठक झाली. मात्र, मालवणच्या मत्स्य व्यवसाय विभागाला त्याची माहितीच नव्हती.मालवणच्या समुद्रात रविवारी घडलेल्या सी वॉर दरम्यान पर्ससीन ट्रॉलर्सवरील जाळी समुद्रात टाकण्यात आली होती. मंगळवारी पर्ससीन ट्रॉलर्स मालक दाखल झाल्यानंतर झालेल्या समन्वय बैठकीत या जाळ्यांचा मुद्दा चर्चिला गेला. या चर्चेत ट्रॉलर्स मालकांनी पारंपरिक मच्छिमारांची जाळी तोडल्याचा आरोप केला. या आरोपामुळे जाळ्यांचा शोध घेत असताना काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र हा तणाव काही काळाचाच राहिला. रात्री उशिरापर्यंत गोव्याचे ट्रॉलर्स समुद्रात जाळ्यांचा शोध घेत होते.