सिंधुदुर्गनगरी : ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ ची घोषणा करण्यात आली असून या सर्वेक्षणामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वेक्षणकार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
हे सर्वेक्षण १ ते ३१ आॅगस्टदरम्यान होणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्वेक्षणात उत्कृष्ट ठरणाºया जिल्ह्यांना २ आॅक्टोबरला महात्मा गांधी जयंतीदिनी सन्मानित करण्यात येणार आहे.उत्कृष्ट काम करणाºया जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणाºया सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राह्य धरली जाणार आहे. यामध्ये हागणदारीमुक्त गावाची पडताळणी, शौचालयांच्या नवीन बांधकामांची पाहणी केली जाणार आहे.
प्रत्यक्ष पाहणीअंतर्गत सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडा बाजार, धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीणभागातील ५० लाख नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष तसेच आॅनलाईन प्रतिक्रिया नोंदविली जाणार आहे.देशभरातील गावांचा समावेशस्वच्छाग्रही खुली बैठक, व्यक्तिगत मुलाखती, सामूहिक चर्चा करून प्रतिक्रिया घेण्यात येणार आहेत.प्रत्येक तीन ते चार गावांचे सरपंच, स्वच्छाग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे.गावाच्या पाहणीदरम्यान गावाची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन स्थिती व कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेल्या उपक्रमांची पाहणी केली जाईल.‘स्वच्छ सर्वेक्षणा’मध्ये देशभरातील ६९८ जिल्ह्यांतील ६ हजार ९८० गावांचा समावेश असणार आहे.ग्रामीण भागातील ५० लाख नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष तसेच आॅनलाईन प्रतिक्रिया नोंदविली जाणार आहे.सर्व ग्रामपंचायतींचा सहभागया सर्वेक्षणात सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेचे निरीक्षण या घटकामध्ये ३९ गुणांचे निरीक्षण होणार आहे.तर नागरिक तसेच मुख्य प्रभावी व्यक्तीची स्वच्छतेबाबतची माहिती, मते व अभिप्राय ३५ गुण व स्वच्छता विषयक सद्यस्थिती याबाबत ३५ गुण असे गुणांकन केंद्रीय समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचा या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत सहभाग असणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.