शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नटबोल्ट गंजल्याने पाणी आत शिरुन नौका समुद्रात बुडू लागली; सुदैवाने रत्नागिरीच्या १५ खलाशांना जीवदान

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 27, 2023 6:15 PM

देवगड ( सिंधुदुर्ग ) : बोटीचे नटबोल्ट गंजल्याने त्याच ठिकाणाहून पाणी पर्सनेट नौकेच्या आत शिरू लागल्याने रत्नागिरी बंदरातील पर्सनेट ...

देवगड (सिंधुदुर्ग) : बोटीचे नटबोल्ट गंजल्याने त्याच ठिकाणाहून पाणी पर्सनेट नौकेच्या आत शिरू लागल्याने रत्नागिरी बंदरातील पर्सनेट मच्छीमारी नौका कुणकेश्वरनजीकच्या समुद्रात बुडू लागली होती. देवगडमधील मच्छीमार अक्षय हरम व त्याचे सहकारी मदतीला धावून बोटीचे इंजिन सुरू करून बोटीसह १५ खलाशांचा जीव वाचविला आहे. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास खोल समुद्रात घडली आहे.अधिक माहिती अशी की, रत्नागिरीमधील गजानन माउली ही पर्सनेट नौका कुणकेश्वर समुद्रात मच्छीमारी करीत असतानाच बोटीच्या समोरील भागातील नटबोल्ट गंजल्याने त्या ठिकाणाहून पाणी बोटीत शिरू लागले. पाणी शिरल्याने बोटीचे इंजिन बंद पडल्याने बोट बुडू लागली. याचवेळी त्यांनी देवगडमधील मच्छीमार अक्षय हरम यांना मोबाइलवरून संपर्क साधला असता त्यांनी आपल्या मालकीची बन्सी ही नौका घेऊन तातडीने बुडत असलेल्या गजानन माउली या बोटीकडे धाव घेतली. सुरुवातीला सर्व खलाशी आपल्या नौकेमध्ये घेतले. यानंतर अथक परिश्रमाने बंद पडलेले बोटीचे इंजिन सुरू करून पंपाने पाणी उपसा करीत ही बोट देवगड बंदरात सुखरुप आणली.

एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंतएकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे देवगडमधील मच्छिमारांना रत्नागिरीतील समुद्रात बुडत असलेल्या बोटीवरील खलाशांचे प्राण वाचविले. या त्यांच्या कृत्याबाबत देवगडमधील मच्छीमार अक्षय हरम व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांनी वेळीच समुद्रात जाऊन या बोटीवरील खलाशांना आपल्या बोटीमध्ये घेतले नसल्यास मोठा अनर्थ झाला असता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग