कणकवली : पिसेकामते गावठणवाडी येथे गेली दोन वर्षे गवे धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे पावसाळी तसेच उन्हाळी शेती करणे अनेक शेतकºयांनी बंद केले आहे. या गव्यांच्या उच्छादापासून आपल्याला वाचवावे अशी मागणी पिसेकामते येथील त्रस्त शेतकºयांकडून करण्यात येत आहे.
पिसेकामते गावात शेतीसाठी बाराही महिने पाणी उपलब्ध असते. त्यामुळे अंकुश गुरव, गणेश गुरव, विष्णू गुरव, राजेंद्र गुरव, प्रकाश गुरव, विजय मोहिते अशा अनेक शेतकºयांनी एकत्र येत उन्हाळी भुईमूग करण्याचे ठरविले. तसेच या पिकाबरोबरच इतर पिकांची लागवड केली. मात्र, गव्यांनी या संपूर्ण पिकाची नासधूस करून टाकली आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.गतवर्षी अंकुश गुरव, विलास गुरव यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात गव्यांनी नुकसान केले होते. त्यावेळी माजी उपसरपंच ज्ञानदेव गुरव यांनी या घटनेची माहिती शासकीय यंत्रणेला दिली होती. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी पार्सेकर व गुडेकर यांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली होती. तसेच पंचनामाही केला होता. मात्र, त्यानंतरही गव्यांचा त्रास सुरूच आहे.
तेथील शेतकरी एकत्र येऊन हजारो रुपयांचे बियाणे घेऊन मोठ्या कष्टाने उन्हाळी शेती करीत आहेत. पण गव्याच्या त्रासामुळे शेतकºयांचे नुकसानच होत आहे. तसेच त्यांचे सर्व परिश्रम वाया जात आहेत.या समस्येकडे ज्ञानदेव गुरव यांनी वनक्षेत्रपाल सोनवडेकर यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी वनकर्मचाºयांना पाठवून नुकसानीचा पंचनामा केला. मात्र, गव्यांच्या समस्येवर ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे.
पिसेकामते येथील अनेक शेतकरी त्रस्त झाले असून नंदकुमार भोगले, अंकुश गुरव यांच्या काजूबागेचे तर जगन्नाथ मोहिते यांच्या चवळी, मूग यांचे नुकसानसुद्धा गव्यांनी केले आहे. गव्याच्या या त्रासामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. महिलावर्ग गव्यांच्या भीतीमुळे जंगलात जाणे टाळत आहे. त्यामुळे दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे. गव्यांच्या या समस्येवर वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि दिलासा द्यावा अशी मागणी शेतकºयांतून करण्यात येत आहे.