शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

मध्यरात्री पालकमंत्री उदय सामंताचा एक फोन अन् संकटात सापडलेल्या तरूणांना मोलाची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 6:18 PM

पुणे येथे सहा युवक गोवा येथे फिरायला गेले होते. गेले तीन ते चार दिवस हे युवक गोव्यात होते. त्याच वेळी या युवकांमधील नयन संतोष घुगले याला गुरूवार पासून पाठीत त्रास होत होता तर पोटदुखीही सुरू झाली होती.

अनंत जाधव

सावंतवाडी : पुणे येथील सहा मुले गोवा येथे फिरायला गेली होती. तेथून परतत असतना एका मुलाचा हदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही बातमी पुणे येथील त्या मृत कुटूंबाच्या नातेवाईकांना समजताच त्यांंनी फोनाफोनी केली त्यातील एक जण पालकमंत्री उदय सामंत यांचे मित्र निघाले, त्यांनी शुक्रवारी मध्यरात्री मंत्री सामंत यांना माहिती दिली त्यावेळी ते मुंबई येथे होते तेथूनच सामंत यांनी आपल्या दोन स्वीय सहयकांना सावंतवाडीत पाठवून सर्व प्रशासकीय मदत केली तसेच सर्व सोपास्कर करून मृतदेह ही पुण्याकडे रवाना केला.

पुणे येथे सहा युवक गोवा येथे फिरायला गेले होते. गेले तीन ते चार दिवस हे युवक गोव्यात होते. त्याच वेळी या युवकांमधील नयन संतोष घुगले याला गुरूवार पासून पाठीत त्रास होत होता तर पोटदुखीही सुरू झाली होती. पण आपणास गॅसेसचा त्रास असावा म्हणून त्यांनी औषध घेतले. मात्र हा त्रास काही केल्या कमी होत नव्हता. त्यामुळे पुणे येथे परतण्याचा निर्णय घेतला शुक्रवारी सांयकाळी पुण्याकडे जाणारी आराम बसमध्ये गोव्यात बसले आणि ते निघाले, सिंधुदुर्ग जिल्हयाच्या हद्दीतच पोहचताच नयन यांना अस्वस्थता जाणवू लागली. त्यांच्या छातीत दुखू लागले त्यानंतर झाराप येथे बस थांबवण्यात आली आणि त्यांना लागलीच सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले मात्र रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले तेव्हा सोबतच्या तरूणांना मोठा धक्का बसला, या सर्वांना तेथे उपस्थित असलेले काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंंजारी यांंनी धीर दिला त्यानंतर या मुलांंनी मृत नयनच्या नातेवाईकांनाही माहिती दिली. यावेळी नयनच्या मामाने थेट सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संर्पक करत घटनेची माहिती दिली. यावेळी मंत्री सामंत हे मुंबईत होते. त्यांनी आपले स्वीय सहाय्यक शाहू गुजर व सुरज देसाई यांंना घटनेची माहिती देउन सावंतवाडीत जाण्यास सांगितले व सर्व मदत करण्याच्या सूचना केल्या ते लागलीच सावंतवाडी दाखल होत सर्व कायदेशीर प्रकिया पूर्ण केल्या व मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास रूग्ण वाहिकेने पुण्याकडे रवाना केला तर त्या मुलांंना कारने पुण्याकडे रवाना केले. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं असतं, परंतु पालकमंत्र्यांच्या एका फोनमुळे सगळ्या अडचणीवर मात करता आली.शवविच्छेदन करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात माडखोल गाठले.

सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात सध्या एकच डॉक्टर शवविच्छेदन करतात, मध्यरात्री त्याठिकाणी कोणी नसल्याने संबंधित डॉक्टरांना बोलवण्यासाठी माडखोल यांच्या घरी जावे लागले, पालकमंत्र्याच्या स्वीय सहय्यकांनी समीर वंंजारी व डॉ.मुरली चव्हाण यांना घेऊन थेट माडखोल गाठले आणि मध्यरात्री शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना घेऊन हॉस्पिटलला आले. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंत