शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

ठसेतज्ज्ञांना अपयश

By admin | Published: March 11, 2015 11:18 PM

बांदा चोरीप्रकरण : स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

बांदा : बांदा मुस्लिमवाडी येथे घरफोडी झालेल्या घरालगत रात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्ती फिरताना आढळल्याने स्थानिकांनी सतर्कता दाखवत या युवकाचा पाठलाग केला. मात्र, काळोखाचा फायदा घेत त्याने आपल्या साथीदारासह दुचाकीवरुन गोव्याच्या दिशेने पलायन केले. बांदा पोलिसांनी स्थानिकांच्या सहाय्याने पत्रादेवी हद्दीपर्यंत या तरुणांचा पाठलाग केला. मात्र, ते सापडू शकले नाहीत. चोरीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा संशयित याठिकाणी फिरकल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी रत्नागिरी येथून ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र, चोरट्यांनी हाताळलेल्या वस्तूंवर स्पष्टपणे ठसे उमटले नसल्याने यातून ठोस काही निष्पन्न झाले नाही. बांदा देऊळवाडी व मुस्लिमवाडीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. बुधवारी मुस्लिमवाडी येथील व कामानिमित्त मुंबई येथे असलेले मुजिदुल्ला इस्माईल शेख यांनी आपल्या बंद घरातून २७ हजार रुपये चोरीस गेल्याची तक्रार दिली आहे. तसेच नवाज सादिक खान यांनी पैसे व सोन्याच्या वस्तूंसह चार हजार रुपये किमतीचा मोबाईलही चोरीस गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नवाज खान यांच्या घरालगतच्या अनोळखी व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना त्यांच्या घरातील महिलेने पाहिले. या युवकाचा चेहरा झाकलेला असल्याने तिने याबाबत आरडाओरडा केली असता त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्याने याठिकाणाहून पलायन करत बांदेश्वर मंदिरानजीक पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर वाट पाहत असलेल्या आपल्या साथीदारासह पलायन केले.पोलीस हवालदार रमेश नारनवार यांच्यासह स्थानिकांनी त्याचा गोवा हद्दीलगत पत्रादेवीपर्यंत पाठलाग केला. मात्र, काळोखाचा फायदा घेऊन त्यांनी पलायन केले. याबाबत पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे, उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर यांनी बांदा शहरात नाकाबंदी करत याची कल्पना लगतच्या गोवा पोलिसांना दिली. (प्रतिनिधी)बांदा शहरात गस्त वाढविलीसंशयित पुन्हा याठिकाणी आल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे चोरटे हे स्थानिकच असल्याचा संशय बळावला आहे. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे संशयिताला पलायन करावे लागले. रत्नागिरी येथील ठसेतज्ज्ञ यु. एस. साळुंखे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, चोरट्यांनी हाताळलेल्या वस्तूंवर स्पष्टपणे ठसे न उमटल्याने विशेष काही हाती लागले नाही. चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरात रात्र गस्त वाढविण्यात आली असून लवकरच संशयितांना जेरबंद करण्यात येणार असल्याचे बांदा पोलिसांनी स्पष्ट केले.