शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

प्लास्टिकमुक्तीसाठीचा प्रयत्न कौतुकास्पद

By admin | Published: May 10, 2017 9:43 PM

देवगड नगरपंचायत : मुख्यमंत्र्यांकडून विशेष गौरव; अन्य गावांसाठी स्वच्छतेचा आदर्श

अयोध्याप्रसाद गावकर ।  --लोकमत न्यूज नेटवर्क --देवगड : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा विशेष गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. देवगड-जामसंडे शहरे प्लास्टिकमुक्तसाठी नगरपंचायतीने उचललेले पाऊल व त्याला मिळालेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून मिळालेल्या पुरस्कारामुळे आता प्लास्टिकमुक्ती करून देवगड-जामसंडे नगरपंचायत महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेत आदर्श नगरपंचायत होण्याचा मान मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. २२ मार्च २0१६ रोजी देवगड व जामसंडे ग्रामपंचायती मिळून देवगड-जामसंडे नगरपंचायत अस्तित्वात आली. देवगड नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर काही महिन्यांमध्येच स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या भागामध्ये स्वच्छतेची मोहीम राबवून नगरपंचायतीने विशेष पुरस्कार प्राप्त केला. हा पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देवगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ व नीलेश बांदिवडेकर यांनी स्वीकारला. अल्पावधीतच स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या नगरपंचायतीचे नाव पोहोचले. नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक २७ नोव्हेंबरला होऊन या नगरपंचायतीमध्ये सर्वप्रथम पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा मान प्रियांका साळसकर यांना, तर उपनगराध्यक्षपदी योगेश चांदोस्कर हे विराजमान झाले आहेत. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी देवगड-जामसंडे नगरपंचायत प्लास्टिकमुक्त करण्यासाठी संकल्प केला.सर्वप्रथम नगरपंचायतीच्या मासिक सभेमध्ये हा प्रश्न नगराध्यक्षा साळसकर यांनी उपस्थित करून नगरपंचायत प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन केले. यावेळी नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने हा ठराव घेतला. यानंतर नगरपंचायत भागामध्ये साळसकर यांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिकमुक्त नगरपंचायत होण्यासाठी एक भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून नगरपंचायत प्लास्टिकमुक्त झाली पाहिजे असा संदेश दिला. यासाठी सर्व जनता व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे. व्यापाऱ्यांची बैठक घेऊन प्लास्टिक पिशव्या आपापल्या दुकानात न ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशालाही प्रतिसाद दिला. नगरपंचायत प्लास्टिकमुक्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, आगामी काळात ती प्लास्टिकमुक्त नगरपंचायत होणार आहे.प्लास्टिकमुक्ती होण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत याचा अभ्यास करून देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साळसकर यांनी ८ मार्च २०१७ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून देवगड येथील उमाबाई बर्वे सभागृहामध्ये महिला मेळावा घेतला. यावेळी नगरपंचायत हद्दीमध्ये प्लास्टिकमुक्ती होण्यासाठी महिलांना कापडी पिशव्यांचे प्रशिक्षणही दिले. या मेळाव्याला महिलांनी लक्षणीय उपस्थिती दर्शवीत कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. नगरपंचायत हद्दीमध्ये येणारे सर्व रस्ते, सांडपाणी, गटारे, पथदिवे, पाणी या सर्व समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांनी एक विकासाचा आराखडा तयार केला आहे. नगरपंचायत विकासाच्या दृष्टिकोनातूनही अग्रेसर राहण्यासाठी त्यांची वाटचाल सुरू आहे. देवगड शहराला समुद्रकिनारा लाभला असून, या समुद्रकिनारी पर्यटनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीही नगरपंचायतीने पाऊल उचलले आहे. अल्पावधीतच विकासकामे व शासनाच्या योजना अमलात आणून देवगड-जामसंडे नगरपंचायतीने चांगला ठसा उमटविला. ही नगरपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वी देवगड ग्रामपंचायत व जामसंडे ग्रामपंचायत अशा दोन ग्रामपंचायती होत्या. १९४१ साली देवगड ग्रामपंचायतीची स्थापना झाली. त्यावेळेपासून आतापर्यंत देवगड ग्रामपंचायतीमध्ये २३ सरपंच विराजमान झाले होते. १९४१ मध्ये देवगडचे पहिले सरपंच होण्याचा मान सदाशिव गोपाळ जगताप यांना मिळाला. यानंतर १९४५ साली शंकर श्रीपाद घोलप यांनी सरपंचपद भूषविले. यानंतर १९४५ ते १९५० या कालावधीमध्ये मनोहर महादेव पारकर, तर १९५० ते १९५२ गणेश राजाराम नाडकर्णी, १९५२ ते १९६४ या काळात नारायण रामचंद्र बोडस, १९६४ ते १९६५ एल. एस. पाटील, १९६५ ते १९७० श्रीकृष्ण गवाणकर, १९७० ते १९७५ लक्ष्मण कोयंडे, १९७५ ते १९७८ वसंत सदाशिव साटम, १९७८ ते १९८० चंद्रकांत खडपकर, १९८० ते १९८४ वसंत साटम, १९८४ ते १९८६ विद्याधर कार्लेकर, १९८६ ते १९८७ चंद्रकांत खडपकर, १९८७ ते २००२ सुधीर जनार्दन ढोके, २००२ ते २००७ जयश्री रुमडे, २००७ ते २०१२ सुधीर जनार्दन ढोके आणि २०१२ ते २०१६ पूनम मुणगेकर यांनी देवगड ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविले आहे.सुधीर ढोके यांनी सर्वाधिक २५ वर्षे सरपंचपद भूषविले. जल वाहतुकीच्या काळात म्हणजेच मुंबई-गोवा वाहतूक बोट सुरू होती त्यावेळी देवगड बंदर हे महत्त्वाचे बंदर होते. अशावेळी देवगड बंदरामध्ये जनतेला सोयीसुविधा उपलब्धसाठी १९६२ साली देवगड ग्रामपंचायतीने वेगवेगळया सोयी जनतेला निर्माण करून दिल्या होत्या. देवगड बंदर हे ऐतिहासिक बंदर असून, तालुक्याचे ठिकाण असल्याने देवगड ग्रामपंचायत ही महत्त्वाची ग्रामपंचायत होती. यामुळे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देवगड गावाचा विकास होणे महत्त्वाचे होते. १९४१ ते २०१६ पर्यंत सरपंचपद भूषविलेल्या २३ सरपंचांनी देवगडचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. २००८ ते २००९ मध्ये देवगड ग्रामपंचायतीला पर्यावरणरत्न पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार, तंटामुक्ती पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जामसंडे ग्रामपंचायतीलाही पर्यावरणरत्न पुरस्कार व निर्मलग्राम पुरस्कार मिळाले असून, दोन्ही ग्रामपंचायतींना हागणदारीमुक्त गाव पुरस्कार मिळाले आहेत. कित्येक वर्षांपासून देवगड-जामसंडे भागाला पाणीटंचाईची झळ आहे. या पाणीटंचाईवरती मात करण्यासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीने विविध उपाययोजना आखल्या असून, देवगड-जामसंडे भागात पाणीटंचाई होणार नाही याचे नियोजन नगरपंचायतीने केले आहे.पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्नदेवगड-जामसंडे नगरपंचायत प्लास्टिकमुक्त करून आम्हांला एक वेगळाच आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवायचा आहे. अल्पावधीतच देवगड-जामसंडे नगरपंचायतीने स्वच्छतेमध्ये विशेष पुरस्कार प्राप्त करून आपली ओळख निर्माण केली आहे. असे शासनाचे वेगवेगळे पुरस्कार मिळविण्यासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायत प्रयत्न करणार आहे. देवगड-जामसंडेचा विकास हाच आमचा ध्यास असून, येथील जनतेच्या मनामधील व जनतेला अपेक्षित असलेलाच विकास केला जाणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून देवगडचा विकास साधण्याचा आपला मानस असून, पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातूनही या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. देवगड-जामसंडे भागामध्ये पाणीप्रश्नही महत्त्वाचा प्रश्न आहे. पाणीटंचाईवरती मात करण्यासाठी आपण अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्या योजना येत्या काही महिन्यांमध्ये अमलात आणून पाणीटंचाईची समस्या दूर केली जाणार आहे. - प्रियांका साळसकरनगराध्यक्षा, देवगड-जामसंडे नगरपंचायत१९ नगरसेवक कार्यरतदेवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, शिक्षण व आरोग्य सभापती संजय तारकर, महिला बालकल्याण सभापती श्रुती जाधव, वित्त बांधकाम सभापती उमेश कणेरकर तसेच प्राजक्ता घाडी, विशाखा पेडणेकर, नीरज घाडी, आत्माराम जाधव, विकास कोयंडे, प्रणाली माने, साक्षी वातकर, रोहिणी तोडणकर, हर्षा ठाकूर, राजेंद्र वालकर, उज्ज्वला अदम, बापू जुवाटकर असे १७ नगरसेवक असलेली देवगड-जामसंडे नगरपंचायत आहे, तर गणपत गांवकर व सुभाष धुरी हे दोन स्वीकृत नगरसेवक आहेत. व्यवसायाभिमुख मेळावे घेणार : चांदोस्करदेवगड-जामसंडेच्या जनतेने आतापर्यंत आम्हांला केलेले सहकार्य असेच ठेवून यापुढेही आम्हांला सहकार्य करावे आणि देवगडचा विकास साधण्यासाठी आम्हांला सहकार्य करावे. रोजगाराच्या दृष्टिकोनातूनही या ठिकाणी रोजगार उपलब्ध करण्याचाही आपला मानस असून, बेरोजगारांना रोजगार व व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण मेळावेही घेतले जातील, अशी माहिती उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी दिली.