शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

'गद्दारां'च्या साथीने महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव!, शिवसेना नेत्याची भाजपवर टीका

By सुधीर राणे | Published: September 15, 2022 4:13 PM

मोदी व शहांना मुंबई पालिका सहजासहजी मिळणार नाही

कणकवली: वेदांत फॉक्सकॉन हाच नव्हे तर इतर प्रकल्पही राज्याबाहेर नेऊन मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा हा भाजपचा डाव आहे. त्याला शिवसेनेतील 'गद्दारां'ची साथ असल्याची टीका शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी केली. कणकवली येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.गौरीशंकर खोत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदल्या दिवशी सांगतात आपण मोदी व शहांचे हस्तक आहोत आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जातो. त्यामुळे असे मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे दुर्देव असून ते या पुढील काळात कार्यरत राहणे राज्यासाठी घातक आहे. वेदांता- फॉक्सकॉनमधून दिड लाख कोटींची गुंतवणूक व १ लाख रोजगार मिळणार असल्याचे जाहिर करण्यात आले. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी हा ४ लाख कोटींचा प्रकल्प राज्यात येत असल्याचे सांगितले. त्यासाठी बैठकाही झाल्या. मग हा प्रकल्प रातोरात येथून गेला कसा? केंद्र व गुजरात सरकारने बोलणी करून हा प्रकल्प रातोरात नेला. हाच नव्हे तर बुलेट ट्रेन सारखा प्रकल्पही राज्याबाहेर गेला आहे. या सरकारने ४० गद्दारांच्या सहाय्याने हे प्रकल्प राज्याबाहेर नेले.मोदी व शहांना मुंबई पालिका सहजासहजी मिळणार नाहीमुंबई येथील जेएनपीटी बंदराचे महत्वही कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जिंकण्याची स्वप्ने ही मंडळी बघत आहेत. भाजपा गद्दारांना सोबत घेऊन ही स्वप्ने पाहत आहे. मात्र, १०५ जणांचे हुतात्म्य देऊन ही मुंबई शिवसेनेने व विविध पक्ष तसेच संघटनांनी मिळविली आहे. ती सहजासहजी मोदी व शहा यांना मिळणार नाही.शिंदे गटात गेलेले ते ओवाळून टाकलेलेशिवसेनेतून शिंदे गटात जे गेले आहेत ते ओवाळून टाकलेले होते. त्यांच्या घरातलेही त्यांच्यासोबत नाहीत. त्यांना शिवसेनेतून काढून टाकण्यास यापुर्वीच सांगितलेले होते. त्यांचा ना सरकारला फायदा, ना पक्षाला, ना जनतेला, अशी टीका करतानाच शिवसेनेला जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुकत्यांसाठी आंदोलन करण्याची गरज नाही. कारण अंतर्गत विरोधातून हे सरकार लवकरच पडेल. असा विश्वासही गौरीशंकर खोत यांनी यावेळी व्यक्त केला.राणेंनी बॉडीगार्ड न घेता फिरून दाखवावे!मुंबईत शिंदे गट व शिवसेना यांच्यात झालेल्या वादात नारायण राणेंना पडण्याची गरजच काय ? शिवसैनिकाना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी भाषा ते करत आहेत.त्यांना सिंधुदुर्गात व मुंबईतही शिवसैनिकांनी पराभूत केले आहे. त्यांच्या मुलालाही पराभूत केले हे त्यांनी विसरू नये. २०१४ मध्ये माझ्याही गाडीवर दगडफेक झाली. तरीही आपण बॉडीगार्ड न घेता फिरतो. मग राणे व त्यांच्या पुत्रांनी बॉडीगार्ड न घेता फिरून दाखवावे. असेही गौरीशंकर खोत यावेळी म्हणाले.यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, राजू राठोड, उत्तम लोके, सिद्धेश राणे, बबन मुणगेकर, रुपेश आमडोसकर, तेजस राणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाShiv Senaशिवसेना