कणकवली : कणकवली पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल अमोल परशुराम जाधव (२९, रा. कनकनगर-कणकवली) हे बेपत्ता झाले आहेत. त्याबाबतची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलिस ठाण्यात दिली आहे. अमोल जाधव हे काल, बुधवारी कणकवली पोलिस ठाण्यात वायरलेसवर कार्यरत होते. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ते घरी जेवायला जातो म्हणून घरी गेले. मात्र ते घरी आलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Crime News Sindhudurg: कणकवलीतून पोलिस कॉन्स्टेबल बेपत्ता
By सुधीर राणे | Updated: January 12, 2023 13:50 IST