शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
8
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
9
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
10
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
11
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
12
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
13
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
14
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
15
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
16
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
17
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
18
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
19
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
20
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन

वैभववाडीत पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की

By admin | Published: August 17, 2016 11:38 PM

तावडे पिता-पुत्राचा धिंगाणा : आरामबसवर दगडफेक

वैभववाडी, कणकवली : जानवली (ता. कणकवली) येथे खासगी आरामबसवर दगडफेक करून कोल्हापूरकडे जाणाऱ्या कळसुलीतील तावडे पिता-पुत्रांना करूळ तपासणी नाक्यावर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर वैभववाडी पोलिस ठाण्यात आणल्यावर या पिता-पुत्रांनी धिंगाणा घालून पोलिस उपनिरीक्षकांना धक्काबुक्की करीत निलंबित करण्याची धमकी दिली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींमध्ये शिक्षक परिषदेचे नेते सुधाकर बाबाजी तावडे व त्यांचा चिरंजीव डॉ. सुजित सुधाकर तावडे (रा. कळसुली, कणकवली) यांचा समावेश आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी ९.१० च्या सुमारास जानवलीनजीक आत्माराम ट्रॅव्हल्सच्या बोरिवली ते गोवा जाणाऱ्या सुधाकर तावडे शिक्षक परिषदेचे नेते कळसुली येथील तावडे पिता-पुत्राने पाठलाग करून जानवली पुलानजीक आरामबस अडवून दगडफेक केली. त्याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर त्यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात धिंगाणा घालून उपनिरीक्षकांना धक्काबुक्की केल्याने दिवसभरात दुसरा गुन्हा दाखल झाला. या दोन्ही गुन्ह्यांतील संशयित आरोपी सुधाकर बाबाजी तावडे हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या माध्यमिक शिक्षकांच्या संघटनेचे नेते आहेत, तर त्यांचा चिरंजीव सुजित व्यवसायाने डॉक्टर आहे. त्यामुळे उच्चविद्याविभूषितांकडून घडलेल्या कृत्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.