देवगड : गोवा बनावटीच्या दारूचा विषयावर सर्व सदस्यांनी पंचायत समिती सभेत पोलिस यंत्रणेवर निशाना साधला. गावागावात सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या अवैध दारू व्यवसायाला पोलिस यंत्रणाच जबाबदार आहे, असा आरोप देवगड सदस्यांकडून करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षकांना पत्रव्यवहार करण्याचा ठराव सभेत घेण्यात आला.देवगड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती सुनिल पारकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती डॉ. अमोल तेली, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी अरूण चव्हाण आदी उपस्थित होते.तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गोवा बनावटीच्या दारूव्यवसायावर सदस्य अजित कांबळे, पूर्वा तावडे, सदाशिव ओगले, लक्ष्मण पाळेकर, शुभांगी कदम हे सदस्य आक्रमक झाले. दारू व्यवसायिकांविरोधात चार गुन्हे दाखल केले, हे देवगड पोलिसांचे उत्तरच आश्चर्यकारक असून पोलिसांनी दिलेले उत्तर सभागृहाने फेटाळत अवैध दारू व्यवसायाला पोलिसच कारणीभूत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला.अवैध वाळूव्यवसाय खुलेआमपणे दामदुप्पट भावाने केला जात असून या व्यवसायाला महसूल यंत्रणेचा वरदहस्त आहे. शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. शासनाने अवैध वाळू व्यवसायाला पायबंद घालण्यासाठी वाळू लिलाव प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, अशी मागणी ओगले यांनी केली.पुरळ हुर्शी जेटीच्या कामाला ५० लाख मंजूर असल्याचे पत्र महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड देते. मात्र सभागृहात वेंगुर्ला मेरीटाईम बोर्ड कार्यालयाकडून कामाला मंजुरीच नाही, अशी माहिती दिली जाते हे आश्चर्यकारक असून याबाबत चौकशी करावी, अशी मागणी सदस्य रविंद्र तिर्लोटकर यांनी केली.मुंबईमध्ये बेस्टसेवेच्या मदतीसाठी देवगड आगारातील गाड्या व कर्मचारी पाठविल्याने तालुक्यातील एसटी सेवेवर गंभीर पररिणाम झाला आहे. यापुढे कर्मचाऱ्यांना जावू देणार नाही, असा इशारा पंचायत समिती सदस्यांनी दिला.महिलेचे प्राण वाचविल्याबाबत गौरववाडा पुलावरून ढकलून दिलेल्या महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल वाडातर येथील लक्ष्मण वाडेकर, वासुदेव कोयंडे व पुष्पकांत वाडेकर तर राज्य क्रिकेट संघात निवड झालेल्या सुगंधा घाडी या हिंदळे गावच्या सुकन्येचा देवगड पंचायत समितीच्यावतीने सभापती सुनिल पारकर, उपसभापती डॉ. अमोल तेली व गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पुलावरून ढकलून दिलेल्या महिलेचे प्राणवाचविणाऱ्या लक्ष्मण वाडेकर, वासुदेव कोयंडे व पुष्पकांत वाडेकर या वाडातर ग्रामस्थांचे व मुलींच्या टेनिसबॉल क्रिकेट संघात निवड झालेल्या सुगंधा घाडी हिचा देवगड पंचायत समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती सुनिल पारकर, उपसभापतीडॉ. अमोल तेली, जयप्रकाश परब उपस्थित होते. (छाया : वैभव केळकर)
अवैध दारू व्यवसायाला पोलीस यंत्रणा जबाबदार,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 8:07 PM
panchayat samiti sindhudurg- गोवा बनावटीच्या दारूचा विषयावर सर्व सदस्यांनी पंचायत समिती सभेत पोलिस यंत्रणेवर निशाना साधला. गावागावात सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या अवैध दारू व्यवसायाला पोलिस यंत्रणाच जबाबदार आहे, असा आरोप देवगड सदस्यांकडून करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षकांना पत्रव्यवहार करण्याचा ठराव सभेत घेण्यात आला.
ठळक मुद्देअवैध दारू व्यवसायाला पोलीस यंत्रणा जबाबदारदेवगड पंचायत समिती सभेत सदस्यांचा निशाणा