वैभववाडी : किरकोळ बाचाबाचीनंतर वैभववाडीतील सदानंद ऊर्फ बाबू बापू रावराणे याने ओम्नी अंगावर घालून पोलिस कर्मचारी मनोज बबन कदम यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. कदम या हल्ल्यातून सुदैवाने बचावले असून त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. रविवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास येथील संभाजी चौकात हा थरार घडला. न्यायालयाने सदानंद ऊर्फ बाबू रावराणेला ४ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रवीण चिंचाळकर यांनी सायंकाळीकर्मचाऱ्यांना घेऊन मनोज कदम शहरात फिरत होते. रात्री सव्वाबाराच्या सुमारास पोलिसांची सुमो संभाजी चौकात थांबली असता एम. एच. 0७, क्यू- ४१८५ या क्रमांकाची मारुती ओम्नी रस्त्यावर थांबवून सदानंद रस्त्यात खुर्ची टाकून बसला होता. पोलिस चालक मनोज कदम यांनी त्याला रस्त्यावरून बाजूला बसण्यास सांगितले. त्यावेळी कदम व रावराणे यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. त्यानंतर सदानंद रावराणे तेथून ओम्नीतून निघून गेला. सदानंद गेल्यावर पोलिस चालक मनोज कदम आपल्या सुमोकडे गेले. सुमोच्या पुढच्या भागावर (बॉनेटवर) हात टेकून कदम पाठमोरे उभे राहिले होते. त्यावेळी पोलिस ठाण्याकडून सुसाट आलेल्या सदानंद रावराणे याच्या ओम्नीने कदम यांना धडक दिली; परंतु कदम यांचे दैव बलवत्तर म्हणून ते या हल्ल्यातून बचावले. इतकेच नव्हे तर ‘तुला संपवणार होतो; पण वाचलास’ असे उद्गार रावराणे याने काढले, असे कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे. कदम यांच्या दोन्ही पायांना गुडघ्याच्याखाली गंभीर दुखापत झाली आहे.कदम यांच्या सहकाऱ्यांनी ओम्नीसह सदानंदला ताब्यात घेऊन पोलिस कर्मचाऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सदानंद ऊर्फ बाबूला ४ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. (प्रतिनिधी)
पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2016 12:02 AM