वैभववाडी : सांगुळवाडी येथील उद्योजक दत्ता काटे आणि उंबर्डे येथील निवृत्त पोलीस निरीक्षक संदीप सरवणकर यांनी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींना पोर्टेबल ऑक्सिजन कॅन उपलब्ध करून दिले आहेत. दरम्यान, खांबाळेच्या सरपंच गौरी पवार यांच्याकडे त्यांनी तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते हा पोर्टेबल ऑक्सिजन कॅन सुपुर्द केला.तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. या संकटसमयी तालुक्यातील काही ग्रामपंचायतींना उद्योजक दत्ता काटे आणि निवृत्त पोलीस निरीक्षक संदीप सरवणकर यांनी पोर्टेबल ऑक्सिजन देण्याचा निर्णय घेतला. हा पोर्टेबल ऑक्सिजन खांबाळे, सोनाळी, लोरे, कुर्ली या ग्रामपंचायतींना देण्याची विनंती शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केली होती. त्यानुसार काटे व सरवणकर यांनी या चारही ग्रामपंचायतींना पोर्टेबल ऑक्सिजन कॅन उपलब्ध करून दिले आहेत.खांबाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी पवार यांच्याकडे हा पोर्टेबल ऑक्सिजन कॅन तहसीलदार झळके यांनी सुपुर्द केला. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, उपसरपंच गणेश पवार, एकावडे, मंडल अधिकारी कदम, पावसकर, खांबाळे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गायकवाड, अमोल चव्हाण, बंडू गुरव, आरोग्य सेविका एस. ए. बोडेकर, आशा स्वयंसेविका शामली देसाई, ग्रामसेवक जी. डी. कोकणी, अंबाजी पवार, रूपेश कांबळे, दत्तात्रय परब, दीपक पवार, राजेंद्र पवार, सदानंद (नंदू) पवार आदी उपस्थित होते....तर मानसिक समाधान लाभेल : काटेतालुक्यात शासनाच्या माध्यमातून सुपरस्पेशालिटी रुग्णालय झाले, तर त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू. आम्ही दिलेल्या पोर्टेबल ऑक्सिजनमुळे एखादा रुग्ण वाचला तरी मानसिक समाधान लाभेल, अशी भावना दत्ता काटे यांनी यावेळी व्यक्त केली.
Oxygen -वैभववाडीतील चार ग्रामपंचायतींना पोर्टेबल ऑक्सिजन सुपुर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 3:23 PM
Oxygen Cylinder vaibhavwadi sindhudurg : सांगुळवाडी येथील उद्योजक दत्ता काटे आणि उंबर्डे येथील निवृत्त पोलीस निरीक्षक संदीप सरवणकर यांनी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींना पोर्टेबल ऑक्सिजन कॅन उपलब्ध करून दिले आहेत. दरम्यान, खांबाळेच्या सरपंच गौरी पवार यांच्याकडे त्यांनी तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते हा पोर्टेबल ऑक्सिजन कॅन सुपुर्द केला.
ठळक मुद्देवैभववाडीतील चार ग्रामपंचायतींना पोर्टेबल ऑक्सिजन सुपुर्द दत्ता काटे, संदीप सरवणकरांनी जपली सामाजिक बांधिलकी