शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

देवगडात काँग्रेसविरोधात महायुतीची शक्यता

By admin | Published: November 10, 2016 11:29 PM

आज फैसला होणार : राष्ट्रवादी युतीमध्ये सामील होणार?; कॉग्रेसची स्वबळावर लढत

अयोध्याप्रसाद गावकर -- देवगड -जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा प्रारंभ केला आहे. काँग्रेस स्वबळावरती निवडणूक लढवीत आहे, तर सेना-भाजपची युती झाली आहे. या युतीमध्ये राष्ट्रवादीला घेऊन महायुती होण्याचीही शक्यता असून, त्याचे चित्र आज, शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.देवगड-जामसंडे नगरपंचायतीची ही पहिली निवडणूक असून, या निवडणुकीमध्ये सत्ता काबीज करून आपापला नगराध्यक्ष बसविण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत आहे. छाननीमध्ये १७ जागांसाठी ७१ अर्ज राहिले आहेत. यामधील प्रभाग क्रमांक ८ मधील भाजपचे बंडखोर उमेदवार संजय बांदेकर, अपक्ष रामदास अनंत अनभवणे आणि प्रभाग क्रमांक १ मधून रवींद्र शेडगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे ६८ उमेदवार रिंगणात असून आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने कोणकोणते उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेणार हे स्पष्ट होणार आहे. भाजप, सेना व राष्ट्रवादी या महायुतीची बोलणी अखेरपर्यंत चालू असून राष्ट्रवादीतील एक गट व शिवसेनेतील काही कार्यकर्ते व भाजपचे काही वरिष्ठ व स्थानिक कार्यकर्तेही महायुती होण्यासाठी प्रयत्नात असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुती अखेरच्या टप्प्यात झाली तर काँग्रेसविरुद्ध महायुती अशी देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये दुरंगी लढत होणार आहे. काँग्रेसची प्रचाराची संपूर्ण धुरा आमदार नीतेश राणे यांच्याकडे असून, त्यांची प्रचाराची रणनीती वेगळीच आहे. तसेच भाजपही प्रचारात वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून मतदारांची मने आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यामुळे देवगड-जामसंडे नगरपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची आघाडी होण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर स्वबळावरती निवडणूक लढवीत आहेत. सध्या सेना-भाजप व राष्ट्रवादी हे तीनही पक्ष काँग्रेसविरोधी असल्याचे दिसून येत आहे.निवडणुकीमध्ये भाजप-सेनेच्या युतीत राष्ट्रवादी पक्ष सहभागी झाला नसला तरी छुप्या पद्धतीने सेना-भाजप व राष्ट्रवादीची युती होऊन काँग्रेसचा पराभव करण्याची त्यांची रणनीती असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीची रंगत वाढत चालली असून, आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच सर्व पक्षांची भूमिका स्पष्ट होऊन खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. मनसे पक्षाने देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एकही उमेदवार उभा केला नसल्याने त्यांचा पाठिंंबा कोणाला मिळतो याचीही उत्सुकता लागून राहिली असली, तरी मनसे सध्याच्या वातावरणात तरी काँग्रेसच्या बाजूने उभे राहणार आहे..भाजपविरोधात काँग्रेसमध्ये थेट लढतदेवगड-जामसंडे नगरपंचायतीची घोषणा झाल्यापासून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये आमदार नीतेश राणे हे आघाडीवर आहेत. जामसंडे भाग हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच जामसंडे-खाकशी भागामध्ये आमदार नीतेश राणे यांनी कित्येक वर्षांपासून भेडसावणारा पाणी प्रश्न सोडविल्याने ही काँग्रेसच्यादृष्टीने जमेची बाजू ठरणार आहे. यामुळे काही प्रभागांमध्ये खरी लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी होणार आहे. शिवसेनेचा एक गट भाजपच्या विरोधातशिवसेनेमध्ये एक गट हा पूर्णत: भाजपच्या विरोधात आहे. त्यांना सेना-भाजपची युती नको आहे. त्यामुळे हा गट आमदार नीतेश राणे आपल्याकडे वळविण्यासाठीही प्रयत्न करत आहेत. याचा फायदा काँग्रेसला निवडणुकीमध्ये होऊ शकतो. तर राष्ट्रवादीचे देवगड- जामसंडे भागातील कार्यकर्ते हे आघाडी होण्यासाठी उत्सुक होते. मात्र, राष्ट्रवादीचे नंदूशेठ घाटे यांचे आघाडी करायची नसल्याचे सुरुवातीपासूनच मत असल्याने कार्यकर्त्यांचे त्यांच्यापुढे काहीच चालेनासे झाले आहे. यामुळे हे राष्ट्रवादीचे नाराज कार्यकर्तेही छुप्या पद्धतीने काँग्रेसला सहकार्य करू शकतात.