शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शिक्षिकेने अनेक विद्यार्थ्यांना दाखवल्या ‘प्रकाशवाटा’

By admin | Published: October 20, 2015 11:05 PM

संपदा जोशी : ज्ञानदानाचा अखंड नंदादीप, भाट्येतील शाळेला दिला उत्कृष्ट शाळेचा दर्जा--नारीशक्तीला सलाम

रत्नागिरी : ‘आई’नंतर मुलं कोणाचं ऐकत असतील तर शाळेतल्या बार्इंचं! शिक्षक आणि मुलं यांचं हे गुरु - शिष्याचं नातं प्रत्येकाच्या आयुष्यातलं अविस्मरणीय नातं असतं. गेली २३ वर्षे ‘ज्ञानदानाचा’ हा अखंड नंदादीप उजळवून संपदा जोशी - कीर यांनी अनेक मुलांच्या आयुष्यात ‘प्रकाशवाटा’ निर्माण केल्या आहेत.‘तिमिरातून तेजाकडे’ या शब्दाप्रमाणे बालमनावर ज्ञानाचे संस्कार करत अज्ञानाच्या तिमिरातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्याचं काम नव्हे; तर एक अखंड व्रत त्या जपत आहेत.२००४ साली मुख्याध्यापक नसलेल्या या शाळेत त्या सहशिक्षिका म्हणून रुजू झाल्या. गावात शाळा होती. पण स्वत:ची इमारत नव्हती. उपशिक्षिका नेहा खेर यांनी आपल्या सहकारी शिक्षिकेसोबत दोन वर्षे मुख्याध्यापकांशिवाय शाळा सांभाळली. याच काळात सुटीच्या दिवशी शाळा तपासणीसाठी आलेल्या चिकलगे यांच्यासमोर शाळेच्या इमारतीचा प्रश्न मांडला. सर्व शिक्षा अभियानातून उपलब्ध निधी अपुरा पडत असल्याने सुरेंद्र रामचंद्र भाटकर, कॅ. दिलीप भाटकर व अन्य ग्रामस्थांच्या मदतीने शैक्षणिक उठावातून ३ लाख निधी उभारून शाळेची इमारत पूर्णत्त्वास नेण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.बदलत्या काळानुसार पंतोजींची छडी जाऊन आनंददायी शिक्षण संकल्पना अमलात आली. समाजातल्या तळागाळातल्या मुलांपर्यंत ही ज्ञानगंगा पोचवण्याची जबाबदारी शिक्षकांवर पडली. यातही कीर यांनी भाट्ये झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात त्या यशस्वीही ठरल्या. प्रसंगी पदरमोड करुन मुलांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देत या मुलांना शाळेत येण्यासाठी प्रवृत्त केलं.मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे, लेखन, वाचन प्रकल्पांतर्गत पुस्तकांची उपलब्धता करून देणे, इंग्रजी भाषेच्या गुणवत्ता वाढीसाठी ढी१स्रङ्म२ा४’ उ१ीं३्र५्र३८ हा प्रोजेक्ट राबवणे, भाट्ये गावाच्या इतिहासातील मानाची पाने असलेल्या शिवरायांच्या आरामारातील मायाजी भाटकर व त्यांचा पुतण्या बालयोद्धा हरजी भाटकर यांची माहिती विद्यार्थ्यांना तैलचित्रांच्या माध्यमातून करुन देण्यासाठी प्रयत्नशील राहाणे, अशा विविध तऱ्हेने अत्यंत मोलाचे असे योगदान या दहा वर्षांच्या काळात संपदा जोशी - कीर यांनी दिले.डॉ. रेश्मा आंबुलकर यांच्याकडून सावित्रीबाई फुले दत्तक - पालक योजनेसाठी निधी मिळवण्याबरोबरच भाट्ये शाळेतील एक हुशार विद्यार्थिनी श्वेताली नेवरेकर हिच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी डॉ. आंबुलकर यांनी कीर यांच्या शिफारसीमुळेच उचलली आहे. तिच्यासाठी क्लासचे पैसे आणि कपडे आदींचा खर्चही त्या करत असून, श्वेताली बी. कॉम.च्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. केवळ आठ तासांची ड्युटी म्हणून काम न करता मुलांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या कीर बार्इंना २००९ साली ‘उपक्रमशील शिक्षिका’ राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. २०१० रोजी ‘गुणवंत शिक्षक सन्मान’ २०११ रोजी रोटरी क्लब आॅफ रत्नागिरीतर्फे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.‘कोणत्याही प्रकारची फाईल न पाठवता केलेल्या कामाची दखल घेऊन मिळालेल्या या पुरस्कारांचा त्यांना विशेष अभिमान वाटतो. त्यांच्या या शाळेची माहिती देणारा एक विशेष कार्यक्रम २००७-०८ साली दूरदर्शनवरही सादर करण्यात आला. या कार्यक्रमामुळे भाट्ये शाळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली.अभिनेता रमेश भाटकर, सतीश, अविनाश भाटकर, जयू भाटकर, किशोर भाटकर, दूरदर्शनच्या निर्मात्या रत्ना चॅटर्जी, कॅमेरामन नरसिंग पोतकंठी आदी मान्यवरांप्रमाणेच महाराष्ट्रातील विविध भागातून अनेक लोकांनी भाट्ये शाळेला भेट देऊन या बदलाचे कौतुक केले आहे.आपल्या या कामासाठी तत्कालीन केंद्रप्रमुख अनंत नैकर, मुख्याध्यापिका सुप्रिया पवार, उपशिक्षिका नेहा खेर, भाट्ये ग्रामस्थ यांचं सहकार्य लाभल्याच त्या नमूद करतात.त्याचप्रमाणे आपल्या सुविद्य पत्नीला कायम प्रोत्साहन आणि सहकार्याचा हात पुढे करणारे त्यांचे पती नितीन कीर यांचाही मोठा वाटा असल्याचे त्या सांगतात. (प्रतिनिधी)