शिरोडा : रासायनिक शेतीचे विष टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यासाठी प्रसार व चळवळ उभी करून उत्पादनात वाढ करण्यासाठी सिंधुुदुर्ग डिस्ट्रिक्ट आॅर्गनिक (सेंद्रीय) फार्म संघ निर्माण करून देश- विदेशांत उत्पादनाला मार्केट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. भूमी प्रतिष्ठानचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक बाळासाहेब परूळेकर यांच्या अध्यक्षतेखाली सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक झाली. सिंधुदुुर्ग जिल्ह्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची एक बैठक घेऊन संस्था स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी रामानंद शिरोडकर, रणजित सावंत, अभिमन्यू लोंढे, अरुण गावडे, सुनील देसाई, काका भिसे, दीनानाथ बांदेकर, लक्ष्मण मोरजकर, रामचंद्र कोचरेकर, नाना आवटी, पुरुषोत्तम दळवी, मोहन परब, शिवाजी दळवी, विश्वनाथ मुंडले, चारुदत्त देसाई, कृष्णा मोरजकर, बाजीराव झेंडे, प्रकाश वालावलकर, सुरेश परब शेतकरी उपस्थित होते. रासायनिक शेतीमुळे आज विदेशातही शेती मालाला किंमत नाही. तसेच आरोग्य व जमिनीलाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रासायनिक विषाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज बाळासाहेब परूळेकर यांनी सांगून सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणारे देश व भारतातील राज्यांची माहिती दिली. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीचे फायदे स्पष्ट करून उत्पादन, विक्री व सेंद्रिय खतांची माहिती दिली. (प्रतिनिधी)जिल्हा कमिटी स्थापण्याचा निर्णययावेळी जिल्ह्यात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्रित करून चळवळ उभी करण्याचे नियोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आॅर्गनिक (सेंद्रिय) फार्मर्स संघ निर्माण करण्यासाठी बाळासाहेब परूळेकर व रणजित सावंत यांनी जबाबदारी घेऊन पुढीलबैठकीत जिल्हास्तरीय कमिटी स्थापनकरण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात बाळासाहेब परूळेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशात सेंद्रिय शेतीला प्राधान्य हव
By admin | Published: December 10, 2014 8:12 PM